AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Siddharth Jadhav : एवढं तळ गाठायचं नाही…सिद्धार्थ जाधवनं खाली बसून श्रद्धा कपूरला केली विनवणी, अभिनेत्यावर संतापले नेटकरी

Siddharth Jadhav Troll : सिद्धार्थ जाधवचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Siddharth Jadhav : एवढं तळ गाठायचं नाही...सिद्धार्थ जाधवनं खाली बसून श्रद्धा कपूरला केली विनवणी, अभिनेत्यावर संतापले नेटकरी
| Updated on: Oct 30, 2026 | 6:12 PM
Share

श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’ या बायोपिकचा बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी आणि श्रद्धा कपूरनं ट्रेलरच्या अपडेट्सद्वारे चाहत्यांची उत्सुकता आधीच वाढवली होती. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित हा चित्रपट, मराठी लोककला क्षेत्रातील महान व्यक्तिमत्व विठाबाई नारायणगावकर (ईठाबाई म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या) यांची अज्ञात आणि खडतर कहाणी मोठ्या पडद्यावर आणणार आहे. ४ डिसेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात रणदीप हुडा महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अशातच आता या सिनेमाच्या ट्रेलर लाॅन्च सोहळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ जाधव दिसत असून अभिनेत्याला ट्रोल करण्यात आलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ‘ईठा’ या सिनेमाच्या ट्रेलर लाॅन्च कार्यक्रमात सिद्धार्थ जाधव श्रद्धा कपूरला विनवणी करताना दिसत आहे. श्रद्धाच्या बाजूला अजय–अतुल बसलेले दिसत आहेत. सिद्धार्थ जाधव खाली बसून श्रद्धा जाधवला विनवणी करताना दिसतोय. यादरम्यान, अभिनेत्रीही भावुक झालेली दिसतेय. सिद्धार्थ बोलवत असतानाही श्रद्धा त्याच्यासोबत जात नाही, यावरून नेटकऱ्यांनी अभिनेत्यावर संताप व्यक्त केला आहे.

व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

एका युजरने कमेंट करत लिहिलं की, ‘अरे सिद्धार्थ तू सुद्धा मराठी सिनेमाचा राजा आहेस विसरू नको…एवढं तळ गाठायचं नाही भाऊ’, दुसऱ्या एका युजरने लिहिलं की, ‘सिद्धार्थ जाधव खाली बसायची काही गरज नव्हती‘, आणखी एका नेटकाऱ्याने, ‘एवढं खाली बसून आग्रह करायची काय गरज आहे??’ अशी कमेंट केली आहे.

दरम्यान, ‘ईठा’ या सिनेमात श्रद्धा कपूर आणि रणदीप हुडा व्यतिरिक्त, मोहम्मद झीशान अय्युब, अनंत जोशी, सिद्धार्थ जाधव, अक्षरा सिंग, उल्का गुप्ता आणि दिवंगत नाना पाटेकर यांसारखे दिग्गज कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. मॅडॉक फिल्म्सनं यापूर्वी प्रेक्षकांना अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत, आणि त्यामुळे ‘ईठा’ या सिनेमाकडूनही प्रेक्षकांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान