Lenovo चा 10200mAh बॅटरीने सुसज्ज नवीन टॅबलेट लाँच, ही आहे किंमत
लेनोवो आयडियाटॅब प्रो जेन 2 हा नवीन टॅबलेट भारतात लाँच केला आहे. 13-इंचाचा 3.5के डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 8 एस जेन 4 आणि मोठी बॅटरी असलेला हा टॅबलेट आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण या टॅबची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात.

लेनोवोने भारतीय बाजारपेठेत त्यांचा नवीन प्रीमियम टॅबलेट Lenovo Idea Tab Pro Gen 2, सादर केला आहे. या टॅबलेटमध्ये आकर्षक डिस्प्ले, पॉवरफूल प्रोसेसर आणि दीर्घकाळ टिकणारी बॅटरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यात अनेक ऑन-डिव्हाइस एआय (AI) वैशिष्ट्ये देखील आहेत. अशातच वापरकर्त्यांना मनोरंजन, अभ्यास आणि व्यावसायिक कामांसाठी एक अष्टपैलू डिव्हाइस हवे असल्यास त्यांच्यासाठी हा टॅबलेट उत्तम आहे. कंपनीने हा टॅबलेट आकर्षक किमतीत उपलब्ध केला आहे, ज्यामुळे तो प्रीमियम टॅबलेट सेगमेंटमध्ये एक चांगला स्पर्धक बनला आहे.
Lenovo Idea Tab Pro Gen 2 किंमत
Lenovo Idea Tab Pro Gen 2 च्या 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची भारतातील किंमत 39 हजार 999 रूपये आहे. कंपनी 1 मे पासून आपल्या अधिकृत वेबसाइट, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि ऑफलाइन रिटेल स्टोअर्सवर याची विक्री सुरू करेल. लाँच ऑफरचा भाग म्हणून ग्राहकांना 3 हजा रूपयांची त्वरित बँक सवलत देखील मिळेल. तसेच या टॅबलेट मध्ये कंपनी एक वर्षाची वॉरंटीसुद्धा देत आहे.
पॉवरफूल डिस्प्ले आणि फ्लॅगशिप परफॉर्मन्स
या टॅबलेटमध्ये 144Hz रिफ्रेश रेट असलेला 13-इंचाचा 3.5K LCD डिस्प्ले आहे. तसेच या टॅबलेटचा डिस्प्ले डॉल्बी व्हिजनला सपोर्ट करतो आणि 800 nits पर्यंत ब्राइटनेस देतो. तर परफॉर्मन्ससाठी यात स्नॅपड्रॅगन 8s Gen 4 प्रोसेसर असून, त्याला क्वालकॉम हेक्सागॉन NPU आणि ॲड्रेनो 825 GPU जोडलेले आहे. या टॅबलेटमध्ये AI नोट्स, स्मार्ट रीडर, लाइव्ह ट्रान्सक्रिप्ट, गूगल जेमिनी आणि सर्कल टू सर्च यांसारखी प्रगत AI वैशिष्ट्ये देखील आहेत. हा टॅबलेट अँड्रॉइड 16 वर चालतो.
बॅटरी, कॅमेरा आणि प्रीमियम वैशिष्ट्ये
Lenovo Idea Tab Pro Gen 2 मध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मोठी 10,200mAh बॅटरी आहे. फोटोग्राफीसाठी, यात 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. उत्तम ऑडिओ अनुभवासाठी, यात चार JBL स्पीकर्स आणि डॉल्बी अॅटमॉस सपोर्ट आहे. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये वाय-फाय 7, ब्लूटूथ 6 आणि एक USB टाइप-C पोर्ट यांचा समावेश आहे. बॉक्समध्ये लेनोवो टॅब पेन प्लस देखील समाविष्ट आहे, जो 4096 प्रेशर लेव्हल्सना सपोर्ट करतो.