पुढील महिन्यात भारतात iPhone स्वस्त होणार

| Updated on: Jul 13, 2019 | 11:24 PM

जगभरात आज वेगवेगळ्या कंपनीचे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. तरीही iPhone असणाऱ्यांचा तोरा काही वेगळाच असतो. भारतात तर iPhone असणे म्हणजे स्टेटस सिंबॉल मानलं जातं. पण, iPhone हे खूप महाग असल्याने ते सर्वांनाच परवडणारे नसतात. त्यामुळे अनेकजण इच्छा असूनही iPhone घेऊ शकत नाही.

पुढील महिन्यात भारतात iPhone स्वस्त होणार
Follow us on

मुंबई : जगभरात आज वेगवेगळ्या कंपनीचे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. तरीही iPhone असणाऱ्यांचा तोरा काही वेगळाच असतो. भारतात तर iPhone असणे म्हणजे स्टेटस सिंबॉल मानलं जातं. पण, iPhone हे खूप महाग असल्याने ते सर्वांनाच परवडणारे नसतात. त्यामुळे अनेकजण इच्छा असूनही iPhone घेऊ शकत नाही. मात्र, तुमचं iPhone घेण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. कारण, भारतात iPhone हे स्वस्त होणार आहेत.

देशात Foxconn नावाची कंपनी अॅपलसाठी iPhone बनवते. एका मीडिया रिपोर्टनुसार, पुढील महिन्यात भारतात असेम्बल केलेले iPhone XR आणि iPhone XS  हे भारतातील स्टोर्सवरही मिळतील. त्यामुळे iPhone ची किंमत कमी होऊ शकते. भारतात सध्या iPhone XR ची किंमत 56 हजार आणि iPhone XS ची किंमत 1 लाख रुपये आहे.

लोकल प्रॉडक्शनमुळे अॅपल iPhone ची किंमत कमी करु शकते, असं टेक कंसल्टन्सी Canalys चे रिसर्च डायरेक्टर ऋषभ दोशी यांनी सांगितलं.

‘काही काळापूर्वी Apple India ने iPhone 6s चं टीझर जारी केलं होतं. हा iPhone भारतात तयार होणार आहे. तसेच, कंपनी जून्या काही मॉडल्सना असेम्बल करुन भारतात विक्रीसाठी उपलब्ध करण्याच्या तयारीत आहे. त्याशिवाय या iPhone ची विक्री वाढावी यासाठी यांच्यावर मेड इन इंडियाचं टॅगही लावलं जाईल’, अशीही माहिती ऋषभ दोशी यांनी दिली.

तामिळनाडूत Foxconn कंपनी यावर्षीपासून iPhone X सीरीजचे स्मार्टफोन्स असेम्बल करेल. त्याशिवाय, कंपनीची बंगळुरु युनिट अॅपलचे दूसरे iPhone म्हणजे iPhone SE, iPhone 6s आणि iPhone 7 ला असेम्बल करते.

संबंधित बातम्या :

दहा हजार रुपयांपर्यंतचे दमदार स्मार्टफोन्स

Old Car : 30 हजारात WagonR, स्वस्तात Swift Dzire !

Redmi note 7 Pro आता सहज खरेदी करा, फ्लॅश सेलची गरज नाही

लवकरच शाओमीचा 64 मेगापिक्सल कॅमेराचा फोन लाँच होणार