दहा हजार रुपयांपर्यंतचे दमदार स्मार्टफोन्स

सध्या बाजारात 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीचे चांगले स्मार्टफोन उपलब्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच पाच स्मार्टफोनची माहिती देणार आहोत. या स्मार्टफोन्समध्ये तुम्हाला उत्तम फीचर्स, पावरफुल स्पेशिफिकेशन्स कमी किमतीत मिळतील.

दहा हजार रुपयांपर्यंतचे दमदार स्मार्टफोन्स
Follow us
| Updated on: Jul 13, 2019 | 5:13 PM

मुंबई : तुम्ही नवा स्मार्टफोन घ्यायच्या विचारात असाल, तर ही बातमी तुमच्या फायद्याची ठरु शकते. आपण स्मार्टफोन घेताना त्याचे फिचर्स बघतो, स्पेसिफिकेशन्स बघतो. चांगले फिचर्स, दमदार स्पेसिफिकेशन असलेला स्मार्टफोन घ्यायचा असेल, तर त्यासाठी आपल्याला आपला खिसा खाली करावा लागतो. पण जर आपल्याला तेच फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स कमी किमतीत मिळाले तर?

भारतात यावर्षी जवळपास सर्वच मोबाईल कंपन्यांनी आपले स्मार्टफोन लाँच केले. यावेळी कंपन्यांनी दमदार स्मार्टफोन कमी बजेटमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे सध्या बाजारात 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीचे चांगले स्मार्टफोन उपलब्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच पाच स्मार्टफोनची माहिती देणार आहोत. या स्मार्टफोन्समध्ये तुम्हाला उत्तम फीचर्स, पावरफुल स्पेशिफिकेशन्स कमी किमतीत मिळतील.

Realme 3

या स्मार्टफोनमध्ये 19:9 एस्पेक्ट रेशियोसोबत 6.2 इंचाचा फूल एचडी+डिस्प्ले देण्यात आलेला आहे. फोटॉग्राफीसाठी यामध्ये 13 मेगापिक्सल+2 मेगापिक्सलचा ड्युअल रिअर कॅमरा सेटअप देण्यात आलेला आहे. तर सेल्फीसाठी यामध्ये 13 मेगापिक्सलचा AI फ्रंट कॅमरा आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉईड 9 पायवर चालतो. यामध्ये मीडियाटेक हिलियो पी70 प्रोसेसर देण्यात आलं आहे. फोनला पावर देण्यासाठी यामध्ये 4230mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. Realme 3च्या 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत  8,999 रुपये आहे.

Xiaomi Redmi 7A

Xiaomi कंपनी Redmi च्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत स्वस्त स्मार्टफोन्स पोहोचवण्याच्या प्रयत्नात असते. सध्या कंपनीने Redmi 7A हा स्मार्टफोन लाँच केला. या स्मार्टफोनमध्ये 2GB रॅम आणि स्नॅपड्रॅगन 439 प्रोसेसर देण्यात आलं आहे. यामध्ये 5.45 इंचाचा डिस्प्ले आहे. या स्मार्टफोनमध्ये Sony IMX486 सेंसर असलेला 12 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तर 5 मेगापिक्स्लचा सेल्फी कॅमेराही देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 4,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. 16GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 5,999 रुपये आणि 32GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 6,199 रुपये आहे.

Infinix Smart 3 Plus 

Infinix Smart 3 Plus हा स्मार्टफोन 6,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये 720×1520 पिक्सल रिझॉल्यूशनसोबतच 6.21 इंचाचा एचडी+डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा एस्पेक्ट रेशियो 19.5:9 आहे. यामध्ये 2 GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच यामध्ये हिलियो ए22 क्वॉड-कोअर प्रोसेसर देण्यात आलं आहे. यामध्ये 13 मेगापिक्सल+2 मेगापिक्सलचा ड्युअल रिअर कॅमरा सेटअप देण्यात आला आहे. तर सेल्फीसाठी यामध्ये AI पावर्ड 8 मेगापिक्सल सेन्सर देण्यात आलं आहे.

Samsung Galaxy M10

Samsung Galaxy M10 या स्मार्टफोनच्या 2 GB रॅम +16 GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 7,990 रुपये  आणि  3 GB रॅम +32 GB स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 8,990 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.2 इंचाचा एचडी+इनफिनिटी-वी डिस्प्ले देण्यात आलेला आहे. यामध्ये 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमरे तर 5 मेगापिक्सलची सेकंडरी सेन्सर देण्यात आलेला आहे. यामध्ये Exynos 7870 SoC प्रोसेसर आहे, तसेच यामध्ये 3,400mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

Oppo A1K

Oppo A1K या स्मार्टफोनमध्ये 6.1 इंचाचा वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आलेला आहे. यामध्ये 2GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो पी22 SoC प्रोसेसर आहे. Oppo A1K मध्ये 8 मेगापिक्सलटची रिअर कॅमेरा, तर 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमरा देण्यात आलेला आहे. Oppo A1K ची किंमत 7,990 रुपये आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.