महिंद्राने 300 गाड्या परत मागवल्या

| Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM

मुंबई : महिंद्रा अँड महिंद्राने  पिक अप ट्रक इम्पिरीओच्या 300 गाड्या परत मागवल्या आहेत. उद्योगातील सूत्रांनी ही माहिती दिली. या ट्रकमधील खराब रिअर अॅक्सल बदलण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने स्‍टॉक एक्‍सचेंजला पाठवलेल्या आदेशात सांगितले की, एप्रिल आणि जून, 2018 दरम्यान उत्पादित इम्पिरीओ वाहनांच्या रिअर अॅक्सेलची तपासणी करेल. या तपासणीनंतर जर […]

महिंद्राने 300 गाड्या परत मागवल्या
Follow us on

मुंबई : महिंद्रा अँड महिंद्राने  पिक अप ट्रक इम्पिरीओच्या 300 गाड्या परत मागवल्या आहेत. उद्योगातील सूत्रांनी ही माहिती दिली. या ट्रकमधील खराब रिअर अॅक्सल बदलण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने स्‍टॉक एक्‍सचेंजला पाठवलेल्या आदेशात सांगितले की, एप्रिल आणि जून, 2018 दरम्यान उत्पादित इम्पिरीओ वाहनांच्या रिअर अॅक्सेलची तपासणी करेल.

या तपासणीनंतर जर रिअर अॅक्सेलला दुरुस्त करायची गरज असेल तर कंपनी मोफत ते करुन देईल. आम्ही ग्राहकांशी स्वत: संपर्क करु, असं कंपनीने म्हटलंय. पण, कंपनी किती ट्रक परत मागवणार आहे याचे स्पष्टीकरण कंपनीने अद्याप दिलेले नाही.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनी 300 ट्रक परत मागवू शकते.

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने घेतलेला हा निर्णय वाहन रिकॉल करणे म्हणजेच परत मागवण्याच्या एसआयएएमच्या नियमांतर्गत आहे. कंपनीच्या ऑफिशिअल वेबसाईटवर जाऊन ग्राहक त्यांच्या वाहनाला सर्व्हिसिंगची गरज आहे की नाही याची माहिती घेऊ शकतात.

काय आहे रिअर अॅक्सेल?

अॅक्सेल हे गिअर टाकण्यासाठी किंवा चाकं फिरवण्यासाठी याचा उपयेग होतो. हे दोन्ही चाकांच्या मधोमध असतं. चाकाच्या वाहनांमध्ये अॅक्सेल चाकांमध्ये बसवलं जातं, ते चाकासोबत फिरतं किंवा ते चांकांमध्ये फिक्स्डही केलं जातं, ज्याच्या भोवती चाकं फिरतात.