नव्या iPhone ची बंपर किंमत कपात, एका झटक्यात 25 हजारांनी किंमत घटली

Apple ने नव्या iPhone Air ची किंमतीत मोठी कपात केली आहे. Apple चा हा प्रीमियम आयफोन लाँच प्राईजच्या 25 हजार रुपयांनी स्वस्त केली आहे.

नव्या iPhone ची बंपर किंमत कपात, एका झटक्यात 25 हजारांनी किंमत घटली
iPhone Air
| Updated on: Feb 01, 2026 | 6:41 PM

iPhone Air च्या किंमतीत मोठी कपात झाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लाँच झालेल्या या आयफोनची लाँच प्राईज पेक्षा हजारो रुपयांनी स्वस्तात मिळत आहे. याशिवाय आयफोनच्या खरेदीवर बँक डिस्काऊंट आणि एक्स्चेंजर ऑफरचा देखील लाभ मिळत आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर सुरु झालेल्या सेलमध्येय आयफोन खूपच स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे.

iPhone Air च्या किंमतीत मोठी कपात

Apple ने आयफोन एअरला 1,19,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केले होते. फ्लिपकार्टवर हा आयफोन सध्या 99,900 रुपयांच्या किंमतीवर लिस्ट केला आहे. फोनची किंमतीत 20,000 रुपयांच्या बंपर प्राईस कपात झाली आहे. याशिवाय आयफोनच्या खरेदीवर 4,000 रुपयांचा बँक डिस्काऊंट आणि 1,000 रुपयांचा अतिरिक्त डिस्काऊंट मिळू शकतो. या प्रकारे iPhone Air ला 25,000 रुपये स्वस्तात घरी आणता येऊ शकते. फ्लिपकार्टवर हा सेल 1 ते 5 फेब्रुवारी दरम्यान आयोजित केला जात आहे.

iPhone Air चे फिचर्स

Apple या सर्वात स्लीम आयफोन 6.5 इंचाच्या सुपर रेटिना XDR डिस्प्ले सोबत येतो. यात OLED पॅनलचा वापर केला जात आहे, जो 120Hz हाय रिफ्रेश रेट आणि 3000 निट्सपर्यंत पीक ब्रायटनेसला सपोर्ट करतो. Apple ने iPhone Air ला eSIM ओन्ली हँडसेट म्हणून सादर केले होते. याशिवाय यात USB Type C वायर्ड चार्जिंग फिचर देण्यात आले आहे.

हा आयफोन केवळ 5.6mm जाड आहे. शिवाय यात 80% टायटॅनियम बॉडीचा वापर केला आहे. यात 3nm प्रोसेसिंग टेक्नोलॉजीचा A19 Pro Bionic चिपसेट वापरला आहे. हा चिपसेट 6 कोअर CPU, 6 कोअर GPU आणि 16 कोअर न्यूर इंजिनवर काम करतो. या सेंकड जनरेशन डायनामिक कॅचिंग फिचर देण्यात आले आहे. तसेच एडव्हान्स एप्पल इंटेलिजन्स फिचरला सपोर्ट करतो. कंपनीने यात AI साठी डेडिकेटेड N1 चिपचा वापर केला आहे.

सिंगल चार्जमध्ये संपूर्ण दिवसभर चालतो

या फोनच्या मागचा कॅमेरा 48MPचा आहे. यात सेन्सॉर शिफ्ट ऑप्टीजल इमेज स्टेब्लाईजेशन फिचर देण्यात आले आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 18 MP चा सेंटर स्टेज सेल्फी कॅमरा देण्यात आला आहे. कंपनीने याची बॅटरीची माहिती जाहीर केलेली नाही. Apple चा दावा आहे की या फोनची बॅटरी सिंगल चार्जमध्ये संपूर्ण दिवसभर चालते. यात 27 तासांचा व्हिडीओ प्लेबॅक कॅपेसिटी देण्यात आली आहे. यास 30 मिनिटात 50 टक्के चार्ज केले जाऊ शकते.