Micromax चा In सिरीज स्मार्टफोन उद्या लाँच होणार, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

| Updated on: Nov 02, 2020 | 10:31 AM

भारतीय स्मार्टफोन कंपनी मायक्रोमॅक्स पुन्हा एकदा मार्केटमध्ये एंट्री करत आहे.

Micromax चा In सिरीज स्मार्टफोन उद्या लाँच होणार, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
Follow us on

मुंबई : भारतीय स्मार्टफोन कंपनी मायक्रोमॅक्स (Micromax) पुन्हा एकदा मार्केटमध्ये एंट्री करत आहे. कंपनी उद्या (3 नोव्हेंबर) दुपारी 12 वाजता त्यांच्या नव्या In सिरीजमधील स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन पूर्णपणे ‘मेड इन इंडिया’ आहे. (Micromax IN series smartphones is going to launch on 3rd November; know its features and specification)

भारत-चीन सीमेवर तणाव निर्माण झाल्यापासून सातत्याने देशात बॉयकॉट चायनिजचा नारा दिला जातोय. परंतु चिनी स्मार्टफोन कंपन्यांना टक्कर देऊ शकतील असे भारतीय मोबाईल ब्रँड्स सध्या आपल्याकडे नाहीत. परंतु मायक्रोमॅक्स कंपनी कमबॅक करणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यापासून अनेकजण मायक्रोमॅक्सच्या नव्या स्मार्टफोनची किंमत आणि फिचर्स जाणून घेण्यासाठी उत्सूक आहेत.

मायक्रोमॅक्सच्या नवीन स्मार्टफोनची किंमत आणि फिचर्स

मायक्रोमॅक्सच्या इन-सिरीजमध्ये दोन स्मार्टफोनचा (Micromax In 1 आणि Micromax In 1A) समावेश असेल. यापैकी पहिल्या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G35 प्रोसेसर आणि दुसऱ्या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G85 प्रोसेसर असेल. या दोन्ही स्मार्टफोन्सची किंमत 7 ते 15 हजार रुपयांपर्यंत असेल.

मिळालेल्या माहितीनुसार MediaTek Helio G35 प्रोसेसर असलेल्या स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचांचा HD+ डिस्प्ले मिळेल. हा स्मार्टफोन 2GB रॅम + 32GB स्टोरेज आणि 3GB रॅम + 32GB स्टोरेज अशा दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. Micromax In 1a मध्ये 5000mAh ची बॅटरी असेल, तर Micromax In 1 मध्ये 4500mAh ची बॅटरी असू शकते.

दोन जीबी रॅम असलेल्या फोनमध्ये 13+2 मेगापिक्सल्सचा डुअल रियर कॅमरा सेटअप आणि 8 मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा असेल. तर 3GB रॅम असलेल्या फोनमध्ये 13+5+2 मेगापिक्सल्सचा ट्रिपल रियर कॅमरा सेटअप असेल सोबत 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल.

Micromax In 1 मध्ये 48 मेगापिक्सल चा प्रायमरी सेन्सर मिळू शकतो. तसेच Micromax In 1a मध्ये रियर पॅनल व 16 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर असलेल्या ट्रिपल कॅमेरा सेटअप असू शकतो.

मेड इन इंडिया स्मार्टफोन

काही दिवसांपूर्वी राहुल शर्मा यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये म्हटले होते की, मायक्रोमॅक्सचा नवा स्मार्टफोन हा आत्मनिर्भर भारत अभियानाचा एक भाग असेल. या इन-सिरीजचे सर्व स्मार्टफोन मेड इन इंडिया असतील.

संबंधित बातम्या

Xiaomi चा 108 मेगापिक्सल कॅमेरा असलेला फोल्डेबल फोन लाँचिंगच्या मार्गावर, जाणून घ्या फिचर्स

Amazon Sale : सॅमसंग, शाओमी, विवोच्या ‘या’ बजेट स्मार्टफोन्सवर भरघोस सूट

Redmi K30S लाँच, 8 जीबी रॅम, 5000mAh च्या बॅटरीसह दमदार फिचर्स, जाणून घ्या किंमत

Motorola चा किफायतशीर 5G फोन लाँचिंगच्या मार्गावर, जाणून घ्या फिचर्स

(Micromax IN series smartphones is going to launch on 3rd November; know its features and specification)