
बिल गेट्स यांनी स्थापन केलेल्या मायक्रोसॉफ्ट कंपनीत काम करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनीयर आणि प्रोडक्ट मॅनेजरना किती पगार मिळतो, यावरून नेहमीच उत्सुकता असते. आता या संदर्भातील माहिती समोर आली आहे आणि ती खूपच धक्कादायक आहे. जर तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल की जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी टेक कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना किती मोबदला देते, तर ही बातमी नक्की वाचा.
मायक्रोसॉफ्टमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीयरचा बेसिक पगार $82,971 पासून सुरू होतो आणि तो थेट $284,000 पर्यंत जातो. तर प्रोडक्ट मॅनेजरचा पगार $122,800 ते $250,000 दरम्यान असतो. विशेष म्हणजे, AI (Artificial Intelligence) विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना इतरांपेक्षा जास्त पगार दिला जातो.
मायक्रोसॉफ्टने अलीकडे 9,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना कमी केल्यामुळे ती चर्चेत आली होती. पण त्याचवेळी कंपनीने जाहीर केलं की आता ती AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर जास्त भर देणार आहे. Windows मधील Copilot टूल असो की OpenAI सोबतचा भागीदारी प्रकल्प, मायक्रोसॉफ्टने AI मध्ये अब्जावधी डॉलर गुंतवले आहेत.
या पार्श्वभूमीवर, मायक्रोसॉफ्ट आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे पण यावेळी पगारामुळे, छंटणीमुळे नव्हे! Business Insider च्या रिपोर्टनुसार, कंपनीच्या अंतर्गत दस्तऐवजांमधून असं समोर आलंय की AI टूल्स वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून रिटेन्शन बोनस दिला जातो. म्हणजेच, जे कर्मचारी AI प्रकल्पात सक्रीय सहभाग घेतात, त्यांना कंपनी ठेवून घेण्याचा अधिक प्रयत्न करते.
ही सगळी रेंज केवळ विदेशी कर्मचाऱ्यांच्या बेसिक पगाराची आहे, ज्यांची माहिती 2025 च्या सुरुवातीस सादर करण्यात आलेल्या 5,400 पेक्षा जास्त वीजा अर्जांवरून मिळाली आहे. यात बोनस आणि स्टॉक ऑप्शन्सचा समावेश नाही.
AI-केंद्रित पदांसाठी मायक्रोसॉफ्टची LinkedIn देखील भरती करत आहे. उदाहरणार्थ, मशीन लर्निंग क्षेत्रातील स्टाफ सॉफ्टवेअर इंजिनीयरचा पगार $336,000 पर्यंत जाऊ शकतो. तर याच क्षेत्रातील सीनियर इंजिनीयरचा बेस पगार $154,000 पासून सुरू होतो आणि $278,000 पर्यंत पोहोचतो.
एकूणच, मायक्रोसॉफ्टमध्ये AI क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी सोन्याचा काळ आहे. जर तुमच्याकडे AI, मशीन लर्निंग, डेटा सायन्स किंवा टेक्निकल स्किल्स असतील, तर मायक्रोसॉफ्टसारख्या कंपनीत मोठ्या पगारासोबत जबरदस्त संधी तुमची वाट पाहत आहे.