अवघ्या काही मिनिटांत झटपट चार्ज होतोत हे पाच 5G फोन, खिशाला देखील परवडणारे
Five Fast Charging Smartphones : हल्ली प्रत्येकाला स्मार्टफोन पटकन चार्ज करणारा हवा आहे. आम्ही तुम्हाला अशा ब्रॅंडेड स्मार्टफोनची यादी देत आहोत. ज्यात 120 w किंवा त्याहून अधिक चार्जिंग सपोर्ट आहे.
‘टाईम ईज मनी’ असा सध्याचा मंत्र आहे. त्यामुळे तुम्ही जर रात्री मोबाईल चार्ज करायला विसरला तर सकाळी तुमची महत्वाची मिटींग असेल तर तुमच्या झोपेचे खोबरं झालं म्हणून समजा. तुम्हाला सकाळी लवकर उठून फोन चार्जिंगला लावायला लागेल. फोन चार्जिंगला जादा वेळ लागत असेल तर तुमचा पुढील सगळा प्लान बरबाद झाला असे समजाच. त्यामुळे हल्ली जो तो फास्ट चार्जिंग सपोर्टचा फोन घेण्यास प्राधान्य देत असतो. तुमच्या माहीतीसाठी फास्ट चार्ज होणाऱ्या ब्रॅंडेड स्मार्टफोनची यादी देत आहोत. हे फोन 120 W किंवा त्याहून अधिक सपोर्टसह मिळत आहेत, पाहा तुमच्या बजेटमध्ये कोणता फोन फिट बसत आहे.
Redmi Note 13 Pro+
रेडमी नोट 13 Pro+ या स्मार्टफोनची माहीती देत आहोत. हा फोन 120w HyperCharge फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000 एमएएच बॅटरीसह मिळत आहे. रेडमीचा हा स्मार्टफोन केवळ 19 मिनिटांत फूल चार्ज होतो. हा फोन 8GB रॅम सपोर्ट सह मिळत आहे. 256GB स्टोरेज असलेल्या या स्मार्टफोनच्या व्हेरिएंटची किंमत 30,999 रुपये आहे. अॅमेझोनवर या फोनवर 3000 रुपयांपर्यंत कॅश बॅकची ऑफर आहे. त्यामुळे हा फोन तुम्हाला स्वस्तात मिळू शकतो. या फोनमध्ये 200 मेगापिक्सेलचा कॅमेरा, वॉटरप्रुफ रेटिंग, 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटींगसह 3D कर्व्ड एमोलेड डिस्प्ले दिलेला आहे.
Motorola Edge 50 Pro –
मोटोरोलाच्या या Edge 50 Pro फोनमध्ये 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेजवाला व्हेरिएंट 125 W टर्बो पॉवर फास्ट चार्जिंग सपोर्टसह उपलब्ध आहे. फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनची किंमत 35,999 रुपये इतकी आहे. कॅशबॅकचा लाभ घेऊन या फोनची किंमत आणखी कमी होऊ शकते. या फोनमध्ये 144 हर्ट्झ रेटींगचा 6.7 इंचचा 1.5 POLED कर्व्ह डिस्प्लेची सुविधा मिळत आहे. हा फोन AI वर देखील काम करणारा प्रो ग्रेड कॅमेरा सेटअप देखील मिळत आहे.
IQOO Neo 9 Pro –
आयक्यूचा जबरदस्त फोन देखील 129 W फास्ट चार्जिंग सपोर्टसह उपलब्ध आहे, यात 5160 एमएएच बॅटरी आहे. लालचुटूक रंगाचा हा फोन दिसायला देखील भारी आहे. Amazon या फोनच्या 8GB स्टोरेजच्या व्हेरीएंटची किंमत 34,999 रुपये इतकी आहे. बॅक ऑफरचा लाभ घेऊन कॅश बॅकची ऑफर घेऊन याची किंमत आणखी कमी होऊ शकते.या स्मार्टफोनमध्ये 144 हर्ट्झ रिफ्रेश रेटींगचा 6.78 इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले आहे. या फोनमध्ये पावरफूल प्रोसेसर आणि तगडा कॅमेरा सेटअप आणि शक्तीशाली प्रोसेसर देखील आहे.
IQOO 12
iQoo 12 हा प्रीमियम स्मार्टफोन 120W फास्ट चार्जिंग सपोर्टसह बाजारात उपलब्ध आहे. आणि 5000 mAh बॅटरी उपलब्ध आहे. 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या या स्मार्टफोनचा व्हेरिएंट Amazon वर 52,999 रुपयांना उपलब्ध आहे. बँक ऑफरचा फायदा घेऊन तुम्हाला त्याच्यात सूट देखील मिळविता येते. या फोनमध्ये 144 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह 6.78 इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले आहे. स्मार्टफोनमध्ये मजबूत कॅमेरा सेटअप असून याचा प्रोसेसर एकदम शक्तिशाली आहे.
iQOO Neo 7 Pro 5G
iQOO Neo 7 Pro 5G या स्मार्टफोनमध्ये देखील चार्जिंगसाठी 120 w Flash Charge फास्टचार्जिंगचा सपोर्ट सह 5000 एमएएच क्षमतेची बॅटरी आहे. या फोनला संपूर्ण चार्जिंगला 25 मिनिटांचा कालावधी लागतो. amazon वर या फोनचा 8GB रॅम आणि 128 GB स्टोरेजवाल्या व्हेरिएंटची किंमत 29,000 रुपये इतकी आहे. कॅशबॅक ऑफरचा लाभ देखील तुम्हाला मिळू शकतो. या स्मार्ट फोनमध्ये 120 हर्ट्ज रिफ्रेश रेटवाला मोठा एमोलेड डिस्प्ले दिलेला आहे. या फोनचा स्पिकर स्टीरिओ साऊंडवाला आहे. फोनमध्ये उच्च प्रतिचा कॅमेरा आणि शक्तीशाली प्रोसेसर देखील आहे.