
प्राण्यांचं प्रेम खरं असतं असं तुम्ही ऐकलं असेल… पण आता तर ते दिसून आलं आहे. व्यक्तीच्या निधनानंतर माकड स्मशानभूमीत पोहोचला आणि त्याने तिरडी जवळ बसून त्याच्या मृतदेहाला किस केलं आणि अंतिं निरोप घेतला. सध्या या घटनेची सर्वत्र चर्चा सुरु आहे. देवघर येथील सारठ याठिकाणी एका मंत्र्याचं निधन झाला. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी माकड पोहचल्याचं दृष्य समोर येत आहे.
झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते मुन्ना सिंग नावाच्या एका तरुणाचं निधन झालं आहे. या घटनेनंतर एका माकडाने केलेलं कृत्य सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. माकडाने मुन्ना सिंगच्या मृतदेहाचे चुंबन घेतले आणि अंत्यसंस्कारात सहभागी झाला. एवढंच नाही तर, चितेची आग शांत होईपर्यंत तो स्मशानभूमीत बसून राहिला. चित्रा पोलिस स्टेशन परिसरातील ब्रह्मसोली गावात ही घटना घडली.
ही घटना देवघर जिल्ह्यातील चित्रा पोलीस स्टेशन परिसरातील ब्रह्मसोली गावातील आहे. जेएमएम नेते मुन्ना सिंह यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने परिसरात शोककळा पसरली. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठ्या संख्याने लोक स्मशानभूमीत पोहोचले होते. पण माकडाच्या उपस्थितीने सर्वांचं लक्ष वेधलं.
जानवर इंसान से अधिक वफादार होते हैं. आप इस वीडियो को देख लीजिए. बेहद ही मार्मिक है यह. बंदर कफ़न हटाता है, माथे को चूमता है. वीडियो झारखंड के देवघर का बताया जा रहा है. pic.twitter.com/sn56Z89pTr
— Priya singh (@priyarajputlive) June 10, 2025
मिळालेल्या माहितीनुसार, मुन्ना सिंह यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु असताना एक माकड स्मशानभूमीत पोहोचला. मुन्ना सिंह यांचं त्या माकडावर प्रचंड प्रेम होतं. माकडाने मुन्ना सिंगचा मृतदेह पाहिला. त्याने आदराने मृतदेहाचं चुंबन घेतलं. मग तो जाऊन चितेवर बसला.
कुटुंबातील सदस्यांनी माकडाला चितेवरून खाली येण्याची विनंती केली. मग तो चितेवरून खाली आला आणि त्याच्या शेजारी बसला. अंतिम संस्कार होईपर्यंत तो तिथेच राहिला. सध्या सोशल मीडियावर घटनेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
मृतदेहाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी आलेल्या माकडाकडूनही लोकांनी आशीर्वाद घेतला. हे दृश्य पाहिल्यानंतर लोकांनी म्हटलं की, या घटनेवरून असे दिसून येतं की, प्राणी देखील माणसांचं दुःख समजू शकतात. ही एक हृदयस्पर्शी आणि अविश्वसनीय घटना आहे.