माझं लग्न झालंय म्हणून…, लग्नाच्या 12 वर्षांनंतर असं का म्हणाली जिनिलीया डिसूझा?
Genelia D’Souza: रितेश देशमुख यांची पत्नी जिनिलीया डिसूझा हिचं मोठं वक्तव्य; म्हणाली, 'माझं लग्न झालंय म्हणून...', जिनिलिया कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत...

Genelia D’Souza: अभिनेत्री जिनिलिया डिसूझा सध्या आगामी ‘सितारे जमीन पर’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा रंगली आहे. सिनेमात जिनिलिया हिने अभिनेता आमिर खान याच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसणार आहे. अनेक दिवसांनंतर जिनिलिया मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. नुकताच झालेल्या मुलाखतीत जिनिलिया हिने सिनेमातील तिच्या भूमिकेबद्दल मोठं वक्तव्य केलं. भूमिकेसाठी अभिनेत्रीला ऑडिशन देखील द्यावं लागलं. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जिनिलिया हिची चर्चा रंगली आहे.
नुकताच झालेल्या मुलाखतीत जिनिलिया म्हणाली, ‘जेव्हा लोकांना कळलं की मी ‘सितारे जमीनपर’ सिनेमात काम करत आहे, तेव्हा अनेकांनी कौतुक केलं. आमिर खानच्या सिनेमात तू काम करत आहेस. यावर मी म्हणाली, खरंच आमिर सरांचा मोठेपणा आहे, त्यांनी सिनेमासाठी माझी निवड केली. तुम्ही देखील असं करू शकता, तुम्ही देखील मला सिनेमात काम करण्याची संधी देऊ शकता…’
जिनिलिया पुढे म्हणाली, ‘तुम्ही मला अशा भूमिकांमध्ये देखील कास्ट करू शकता, पण तुम्ही नियमांनुसार जा. कदाचित तुम्हाला वाटत असेल की मी विवाहित आहे म्हणून मला या भूमिकेची गरज नाही. मला वाटते की चित्रपट निर्मिती बदलली आहे. म्हणून आपली मानसिकता देखील बदलली पाहिजे.’
View this post on Instagram
‘जर तुम्हाला एका ठराविक वयाची भूमिका हवी असेल. तर त्याच वयाच्या व्यक्तीची निवड भूमिकेसाठी झाली पाहिजे. जेव्हा माझ्यापेक्षा खूपच लहान असलेल्या अभिनेत्याला कास्ट केलं जातं तेव्हा भूमिकेतील बारकावे त्या अभिनेत्याला समजत नाहीत. योग्य भूमिका निवडणे महत्वाचं आहे. मला आशा आहे की सर्वांना संधी मिळतील.’ असं देखील जिनिलिया म्हणाली.
कधी प्रदर्शित होणार ‘सितारे जमीनपर’ सिनेमा
आरएस प्रसन्ना द्वारा दिग्दर्शित स्पोर्ट्स कॉमेडी सिनेमा ‘सितारे जमीनपर’ 20 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. सध्या आमिर खान आणि सिनेमाची टीम प्रमोशन्समध्ये व्यस्त आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ नंतर आमिर मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. आता चाहते देखील सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तयारीत आहेत.
सांगायचं झालं तर, लग्नाच्या 10 वर्षांनंतर जिनिलिया हिने ‘वेड’ सिनेमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. रितेश देशमुळे सिनेमात मुख्य भूमिकेत होता. तर अभिनेता सलमान खान याने देखील सिनेमा पाहुण्या कलाकारची भूमिका बजावली. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर देखील दमदार कमगीरी केली. सिनेमातील गाण्यांना देखील प्रेक्षकांनी विशेष प्रेम दिलं.