
तुमच्याकडे व्हॉट्सअॅप असेल आणि तुम्ही एखाद्याचा नंबर सेव्ह केला की लगेचच त्यात सदर व्यक्ती दिसते. त्यामुळे एखाद्याशी व्हॉट्सअॅप चॅट करणं सोपं होतं. यासाठी फ्रेंड रिक्वेस्ट वगैरे पाठवण्याची गरज नसते. (संग्रहित फोटो)

आता नवे फीचर व्हॉट्सअॅप यूजर्ससाठी आणलं जाण्याची शक्यता आहे. Wabetinfo च्या रिपोर्टनुसार, कंपनी चॅट्स आणि ग्रुप्समधील मोबाईल नंबर्सची सिस्टीम बंद करू शकते. या अपडेट अंतर्गत कंपनी मोबाईल नंबरऐवजी यूजरनेम घेऊ शकते. (संग्रहित फोटो)

WhatsApp च्या बीटा आवृत्ती 2.22.25.10 मध्ये एक अपडेट दिसून आलं आहे.यामध्ये मोबाईल नंबरऐवजी युजरनेम वापरण्यात आले आहे. अनोळखी नंबरवरून येणारा मेसेज सहज ओळखू शकता येणार आहे. कारण नंबरऐवजी नाव दिसेल. (संग्रहित फोटो)

अज्ञात संवादासाठी नंबरएवजी नाव असेल. तर फोन नंबर दुसर्या लेबलवर असेल. रिपोर्टनुसार, या फीचरसह कंपनीची योजना युजरनेम्सचा प्रचार करण्यासाठी आहे. म्हणजेच आगामी काळात मोबाईल क्रमांकाऐवजी युजरनेम दिसणे अपेक्षित आहे. (संग्रहित फोटो)

Wabitinfo ने सांगितले की, युजरनेम फीचर बीटा व्हर्जनवर दिसले आहे. नवीन फीचर्स आणि अपडेट्स टेस्टिंगसाठी पहिल्या बीटा व्हर्जनवर रिलीज करण्यात आले आहेत. त्याचा वापर योग्यरित्या तपासल्यानंतर सामान्य युजर्ससाठी फीचर जारी केले जाईल. (संग्रहित फोटो)