Airtel and Netflix : एअरटेलच्या ‘या’ प्लॅनमध्ये आता नेटफ्लिक्सचेही सबस्क्रिप्शन घ्या… काय आहे ऑफर?

| Updated on: Apr 29, 2022 | 10:53 PM

तुम्ही जर एअरटेल युजर्स असाल अन्‌ सोबत नेटफ्लिक्सचेही चाहते असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. याचे कारण म्हणजे एअरटेलच्या काही प्लॅनसह Netflix चे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध होणार आहे. या लेखातून त्याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

Airtel and Netflix : एअरटेलच्या ‘या’ प्लॅनमध्ये आता नेटफ्लिक्सचेही सबस्क्रिप्शन घ्या... काय आहे ऑफर?
Airtel and Netflix
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : जगभरातून Netflix या ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मला सर्वाधिक प्रेक्षकवर्ग आहे. यावर आपला आवडता कंटेंट स्ट्रीम करण्यासाठी युजर्संना सबस्क्रिप्शन घ्यावे लागते. यासाठी नेटफ्लिक्सकडून मासिक आणि वार्षिक सबस्क्रिप्शन ऑफर करण्यात येत असते. नेटफ्लिक्सची मेंबरशिप (Netflix membership) घेण्यासाठी तुम्ही नेटफ्लिक्सच्या वेबसाइटवर अधिकची माहिती घेऊ शकता. त्या ठिकाणी तुम्हाला यूपीआय, डेबिट/क्रेडिट कार्ड, पेटीएम आणि अन्य माध्यमातून पेमेंटचे पर्याय दिसतात. मात्र, जर तुम्हाला नेटफ्लिक्सचे प्लॅन मोफत किंवा ऑफरमध्ये पाहिजे असतील तर, काही टेलिकॉम कंपन्या (Telecom companies)ही सुविधा देत आहेत. एअरटेलने आधीच त्यांच्या काही प्रीपेड आणि पोस्टपेड स्कीमसह नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन विनामूल्य ऑफर करते. आता, दूरसंचार ऑपरेटरने निवडक ब्रॉडबँड योजनांसह  विनामूल्य नेटफ्लिक्स सदस्यता ऑफर करण्याची घोषणा केली आहे.

एअरटेलचे मोफत प्लॅन

एअरटेल प्रोफेशनल प्लॅन आणि इन्फिनिटी प्लॅन आता मोफत नेटफ्लिक्ससह येतात. एअरटेल प्रोफेशनल प्लॅनची किंमत 1498 रुपये प्रतिमहिना आहे तर इन्फिनिटी प्लॅनची किंमत 3999 रुपये प्रतिमहिना आहे. एअरटेल प्रोफेशनल प्लॅन खरेदी करणाऱ्या युजर्संना नेटफ्लिक्सच्या 199 रुपयांच्या बेसिक प्लॅनमध्ये मंथली एन्ट्री मिळेल. Airtel Infinity प्लॅनची निवड करतात त्यांना नेटफ्लिक्सच्या 649 च्या प्रीमियम प्लॅन उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

भारतात नेटफ्लिक्स प्लॅनची किंमत अशी

नेटफ्लिक्स भारतात मोबाइल प्लॅन, बेसिक प्लॅन, स्टँडर्ड आणि प्रीमियम प्लॅन यासह चार प्लॅन ऑफर करत आहे. मोबाईल प्लॅन 149 रुपये प्रतिमहिना एक स्क्रीन सपोर्टसह येतो, जो मूळ 199 रुपयांच्या प्लॅनसाठी आहे. 2 आणि 4 स्क्रीनसाठी सपोर्टसह 499 रुपयांचा स्टँडर्ड प्लॅन आणि 649 रुपयांचा प्रीमियम प्लॅन मिळतो. नेटफ्लिक्सच्या या तिन्ही प्लानमध्ये फोन, टॅबलेट, कॉम्प्यूटर आणि टीव्हीसह ४ डिव्हाइसचा सपोर्ट मिळतो.

हे सुद्धा वाचा

हे फॉलो करा

>> एअरटेल थँक्स अॅपवरील ‘Discover Thanks Benefits पेजवर जा
>> खाली स्क्रोल करा आणि ‘Enjoy Your Rewards’ मध्ये ‘नेटफ्लिक्स’ वर क्लीक करा.
>> ‘Claim’ वर क्लीक करा.
>> Netflix वरील पेजवर ‘ Procedure पर्यायावर क्लिक करा.
>> ॲक्टीवेशन पूर्ण करण्यासाठी सदस्यास Netflix वेबसाइटवर रिडायरेक्ट केले जाईल.

एअरटेलचे दोन फॅमिली प्लॅन

टेलिकॉम ऑपरेटरने अलीकडेच नेटफ्लिक्स स्टँडर्ड प्लॅनसह दोन एअरटेल पोस्टपेड फॅमिली प्लॅनचे 1199 आणि 1599 रुपयांचे प्लॅन आणले आहेत. याशिवाय, 1599 रुपयांच्या प्लॅनमध्ये मोफत Amazon प्राइम सबस्क्रिप्शन, 500GB पर्यंतचा डेटा रोलओव्हर, अमर्यादित कॉल्स, मोफत सुविधा आहेत. Disney + Hotstar , Airtel Xtreme सबस्क्रिप्शन, अमर्यादित कॉल्स आणि हँडसेट संरक्षणासह मोफत अॅड-ऑन कनेक्शन देण्यात आले आहे.