Samsung Galaxy S25 FE 5G हा स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात करेल एंट्री, लाँच होण्याआधी जाणून घ्या संभाव्य फिचर्स

सॅमसंग लवकरच त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. हा फोन गॅलेक्सी एस25 मालिकेसारखाच डिझाइनचा असणार आहे. चला तर मग आजच्या या लेखात आपण लाँच होण्याआधी या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन जाणून घेऊयात...

Samsung Galaxy S25 FE 5G हा स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात करेल एंट्री, लाँच होण्याआधी जाणून घ्या संभाव्य फिचर्स
| Edited By: | Updated on: Jul 17, 2025 | 5:11 PM

सॅमसंग सध्या त्यांच्या फ्लॅगशिप गॅलेक्सी एस२५ सीरिजमधील एक परवडणारा फोन लाँच करण्याची तयारी करत आहे. तर सॅमसंग कंपनी ऑक्टोबर महिन्यात Galaxy S25 FE 5G स्मार्टफोन लाँच करू शकते. हा सॅमसंग फोन गॅलेक्सी एस25 सीरिजसारख्या डिझाइनसह भारतीय बाजारात येणार आहे. ज्याचे स्पेसिफिकेशन गॅलेक्सी एस25 फोनपेक्षा थोडे कमी असण्यासोबतच हा फोन बजेट किंमतीत लाँच केला जाईल. कंपनी गेल्या वर्षी लाँच झालेल्या एस24 एफईच्या तुलनेत अनेक अपडेट्ससह सॅमसंग गॅलेक्सी एस25 एफई स्मार्टफोन लाँच करेल. चला तर मग आजच्या या लेखात आपण या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन आणि किंमत बद्दल जाणून घेऊयात…

Samsung Galaxy S25 FE 5G ची संभाव्या स्पेसिफिकेशन

Samsung Galaxy S25 FE स्मार्टफोनचा कॅमेरा मोठ्या अपग्रेडसह येईल. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा फोन नवीन डिझाइनसह येणार असून जो स्लिम आणि वजनाने हलका असेल. येणारा गॅलेक्सी स्मार्टफोन Exynos 2400 चिपसेटसह येईल असे वृत्त आहे.

अपकमिंग Samsung Galaxy S25 FE 5G मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा असेल. तर या फोनचा प्रायमरी कॅमेरा 50MP चा आहे, ज्यामध्ये 12MP अल्ट्रावाइड लेन्स आणि 8MP टेलिफोटो लेन्स उपलब्ध असेल. तसेच हा फोन 3x ऑप्टिकल झूमला सपोर्ट करेल.

या फोनचा सेल्फी कॅमेरा 12 मेगापिक्सेलचा असेल, जो पूर्वी 10 मेगापिक्सेल होता. सॅमसंग आपल्या परवडणाऱ्या फोनच्या कॅमेरा सॉफ्टवेअरमध्ये अनेक बदल करणार आहे, ज्यामुळे इमेज क्वालिटी अनेक पटीने वाढेल.

Samsung Galaxy S25 FE 5G: काय खास असेल?

तर लवकरच लॉंच होणाऱ्या Samsung Galaxy S25 FE 5G स्मार्टफोन आर्मर ॲल्युमिनियम फ्रेमसह येईल. या फोनची जाडी फक्त 7.4mm असेल. Samsung च्या या आगामी फोनमध्ये 6.7-इंचाचा LTPO डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले असेल, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असण्याची शक्यता आहे. हा डिस्प्ले गोरिल्ला ग्लास व्हिक्टस + प्रोटेक्शनसह लाँच केला जाईल. हे शक्य आहे की या सॅमसंग फोनमध्ये 4900mAh बॅटरी मिळू शकते, जी 45W चार्जिंगला सपोर्ट करेल. हा सॅमसंग फोन Android 8 वर आधारित OneUI 16 वर चालणार आहे.