पुढच्या आठवड्यात भारतीय बाजारपेठेत धमाकेदार एँट्री घेणार OnePlus आणि Oppo चे ‘हे’ स्मार्टफोन, जाणून घ्या लीस्ट

वनप्लस, विवो आणि ओप्पो मे 2026 मध्ये भारतात नवीन स्मार्टफोन लाँच करत आहेत. या लीस्टमध्ये फ्लॅगशिप आणि मिड-रेंज दोन्ही पर्यायांचा समावेश आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण पुढील आठवड्यात लाँच होणाऱ्या नवीन फोन्सबद्दल जाणून घेऊयात.

पुढच्या आठवड्यात भारतीय बाजारपेठेत धमाकेदार एँट्री घेणार OnePlus आणि Oppo चे हे स्मार्टफोन, जाणून घ्या लीस्ट
| Edited By: | Updated on: May 05, 2026 | 3:57 PM

स्मार्टफोन प्रेमींसाठी मे महिना खूप खास असणार आहे. या महिन्यात अनेक आकर्षक स्मार्टफोन्स भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहेत. प्रीमियम फ्लॅगशिप्सपासून ते मिड-रेंज डिव्हाइसेसपर्यंत प्रत्येक बजेट आणि गरजेनुसार नवीन पर्याय उपलब्ध होणार आहेत. वनप्लस, विवो आणि ओप्पो यांसारख्या आघाडीच्या कंपन्या त्यांचे पॉवरफूल स्मार्टफोन्स लाँच करण्याच्या तयारीत आहेत. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याची वाट पाहत असाल तर मे महिना ही योग्य वेळ असू शकते. चला या महिन्यात येणाऱ्या सर्वात लोकप्रिय स्मार्टफोन्स कोणते आहेत ते जाणून घेऊयात.

OnePlus Nord CE 6 सीरीज

वनप्लस 7 मे रोजी त्यांचा नवीन Nord CE 6 सिरीज लाँच करणार आहे. या सिरीजमध्ये OnePlus Nord CE 6 आणि Nord CE 6 Lite यांचा समावेश असेल. तर Nord CE 6 या फोनमध्ये 1.5के डिस्प्ले, 144 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि स्नॅपड्रॅगन 7s Gen 4 प्रोसेसर असेल हे निश्चित झाले आहे. तसेच या सिरीज फोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, ड्युअल-ॲक्सिस ओआयएस आणि मोठी 8000 mAh बॅटरी असेल. नॉर्ड सीई ६ लाइटमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 एपेक्स चिपसेट आणि 7000 mAh बॅटरी असण्याची शक्यता आहे. ही सिरीज मिड-रेंज सेगमेंटमध्ये एक प्रबळ दावेदार असल्याचे दिसते.

Vivo X300 Ultra

विवो X300 Ultra हा स्मार्टफोन 7 मे रोजी लाँच होईल. हा कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात प्रगत कॅमेरा स्मार्टफोन असू शकतो. यामध्ये 6.82-इंचाचा 2के अमोलेड डिस्प्ले आणि 144 हर्ट्झ रिफ्रेश रेट असेल. हा फोन स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 प्रोसेसरवर चालेल. याचा कॅमेरा सेटअप हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे, ज्यामध्ये 200 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 200 मेगापिक्सेलचा पेरिस्कोप टेलीफोटो सेन्सर समाविष्ट आहे. 6,600 mAh बॅटरी आणि 100 वॅट वायर्ड व 40 वॅट वायरलेस चार्जिंग याला आणखी खास बनवते.

Vivo X300 FE

ज्या वापरकर्त्यांना कमी किमतीत फ्लॅगशिप फिचर्स हवे आहेत, त्यांच्यासाठी Vivo X300 FE हा एक उत्तम पर्याय असू शकतो. या फोनमध्ये 6.31-इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि स्नॅपड्रॅगन 8 जनरेशन 5 प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. तर फोनच्या कॅमेऱ्यांमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 50MP टेलीफोटो कॅमेरा यांचा समावेश आहे. 6,500mAh बॅटरीवर चालणाऱ्या या फोनला IP68 आणि IP69 रेटिंग मिळण्याची शक्यता आहे. हा फोन स्टाईल, परफॉर्मन्स आणि टिकाऊपणा यांचा एक उत्तम मिलाफ ठरू शकतो.

Oppo Find X9 Ultra

Oppo Find X9 Ultra हा फोन पुढील आठवड्यात लाँच होण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनमध्ये हॅसलब्लॅड कॅमेरा टेक्नॉलॉजी असेल. यात 6.82-इंचाचा QHD+ AMOLED डिस्प्ले आणि स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 प्रोसेसर असेल. कॅमेरा सेटअपमध्ये 200MP प्रायमरी सेन्सर, 50MP अल्ट्रा-वाइड, 200MP टेलीफोटो आणि 50MP अल्ट्रा-टेलीफोटो कॅमेरा यांचा समावेश असू शकतो. हा फोन 8K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करेल. तसेच, यात 7050mAh बॅटरी, 100W फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंग असण्याचीही शक्यता आहे.

Oppo Find X9s

Oppo Find X9s हा फोन कंपनीच्या फ्लॅगशिप सीरीजमधील एंट्री-लेव्हल मॉडेल असेल. यामध्ये 6.59-इंचाचा AMOLED डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि MediaTek Dimensity 9500s प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. फोटोग्राफीसाठी यात हॅसलब्लॅड-ट्यून केलेला 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल. सेल्फीसाठी 32MP फ्रंट कॅमेरा अपेक्षित आहे. 7025mAh बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंगमुळे हा फोन दीर्घ बॅटरी लाईफ आणि फास्ट चार्जिंगचा एक उत्तम मिलाफ ठरतो. प्रीमियम फीचर्ससह हा फोन एक परवडणारा पर्याय ठरू शकतो.

 

Follow Us