ChatGPT बनवणाऱ्या OpenAIचा स्मार्टफोन येणार! अॅपल-सॅमसंगला देणार टक्कर, काय असणार खास?

openai smartphone launch : फोनच्या जगात आता नवी क्रांती येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण आता चाटजीपीटी बनवणाऱ्या कंपनीने स्वतःचा स्मार्टफोन बाजारात आणण्याचं ठरवलं आहे. हा फोन युजर्सना एक नवा अनुभव देऊ शकतो असा दावा करण्यात येत आहे.

ChatGPT बनवणाऱ्या OpenAIचा स्मार्टफोन येणार! अॅपल-सॅमसंगला देणार टक्कर, काय असणार खास?
openai smartphone launch
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 19, 2026 | 10:40 PM

सध्या सर्वत्र एआयचीच हवा आहे. अनेक कंपन्या आता एआयवर आधारित तंत्र आत्मसात करुन स्वतःला अपडेट करत आहेत. स्मार्टफोनमध्ये एआयशिवाय पर्याय राहिलेला नाही. सध्या बाजारात येणाऱ्या प्रत्येक फोनमध्ये एआय असतोच त्याचमुळे आता  ChatGPT विकसित करणारी OpenAI आता स्मार्टफोन बाजारात उतरण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. कंपनीचा पहिला स्मार्टफोन 2027 च्या अखेरीस किंवा 2028 मध्ये बाजारात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे, आयफोनच्या निर्मितीशी संबंधित फॉक्सकॉनची उपकंपनी या फोनची असेंबलिंग करणार असल्याचा दावा सप्लाय चेन रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

या स्मार्टफोनमध्ये AI एजंट हे मुख्य आकर्षण असू शकते. अॅपल आणि सॅमसंगसारख्या कंपन्यांना OpenAI कडून स्पर्धा मिळणार असल्याचीही चर्चा यामुळे सुरु झाली आहे. फोनची निर्मिती कोण करणार आणि त्यात कोणती खास वैशिष्ट्ये असणार याबद्दलही उत्सुकता लागली आहे.

Loading...

आयफोन बनवणाऱ्या कंपनीकडे फोनच्या निर्मितीची जबाबदारी

फॉक्सकॉनची उपकंपनी FIH Mobile OpenAI च्या स्मार्टफोनची असेंबलिंग करणार असल्याचा दावा एका सप्लाय चेन रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. हीच कंपनी इलेक्ट्रॉनिक उपकरणांची निर्मिती आणि असेंबलिंग करते. फॉक्सकॉन ही अॅपलच्या आयफोनची प्रमुख उत्पादक कंपनी आहे.

 अॅपलच्या पुरवठादारांचाही प्रकल्पात सहभाग

OpenAI च्या स्मार्टफोनसाठी लक्सशेअर प्रिसिजन, लिंगयी आयटेक आणि एएसी टेक्नॉलॉजीज या कंपन्या विविध सुटे भाग पुरवू शकतात. या कंपन्या यापूर्वी अॅपलच्या आयफोनसाठीही सुटे भाग पुरवत असल्याचे वृत्त आहे.

स्मार्टफोनमध्ये AI एजंटची खासियत असणार

या फोनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सला अधिक महत्त्व दिले जाण्याची शक्यता आहे. सध्याच्या स्मार्टफोनप्रमाणे वेगवेगळे अॅप उघडण्याऐवजी AI एजंटच्या मदतीने अनेक कामे थेट करता येतील, अशी चर्चा आहे. त्यामुळे फोन वापरण्याचा अनुभव बदलू शकतो.

अॅपल आणि सॅमसंगला मिळणार टक्कर

OpenAI चा स्मार्टफोन बाजारात आल्यास अॅपल आणि सॅमसंगसारख्या कंपन्यांसमोर नवे आव्हान उभे राहू शकते. मात्र, फोनचे डिझाइन, किंमत, फीचर्स आणि लॉन्चची तारीख अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेली नाही. OpenAI किंवा फॉक्सकॉननेही या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us