ओप्पोचा 6000mAh बॅटरी असणारा 5G फोन लाँचिंगसाठी सज्ज, किंमत फक्त…

Oppo कंपनी लवकरच भारतीय बाजारात Oppo K13x 5G हा स्मार्टफोन लाँच होणार आहे. Oppo चा हा स्मार्टफोन बजेट किमतीत लाँच होण्याची शक्यता आहे.

ओप्पोचा 6000mAh बॅटरी असणारा 5G फोन लाँचिंगसाठी सज्ज, किंमत फक्त...
oppo k13x 5g
| Updated on: Jun 16, 2025 | 4:40 PM

नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारात असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. Oppo कंपनी लवकरच भारतीय बाजारात Oppo K13x 5G हा स्मार्टफोन लाँच होणार आहे. Oppo चा हा स्मार्टफोन बजेट किमतीत लाँच होण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये 6000mAh ची शक्तीशाली बॅटरी दिली जाणार आहे. या फोनची वैशिष्ट्ये काय आहेत ते जाणून घेऊयात.

हा फोन कुठे खरेदी करता येणार?

Oppo कंपनीने या फोनच्या लाँचची तारीख जाहीर केली आहे. हा फोन 23 जूनला लाँच केला जाणार आहे. हा फोन 15,000 रुपयांच्या सेगमेंटमध्ये येणार आहे. Oppo चा हा फोन ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर खरेदी करता येणार आहे. तसेच हा फोन मिडनाईट व्हायलेट आणि सनसेट पीच या दोन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.

Oppo K13x 5G स्मार्टफोनची वैशिष्ट्ये

Oppo चा हा स्मार्टफोन मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 प्रोसेसरसह लाँच होणार आहे. हा फोन अँड्रॉइड 15 वर चालणार आहे. हा फोन 4 जीबी / 128 जीबी आणि 6 जीबी /128 जीबी या दोन स्टोरेज पर्यायांमध्ये लाँच केला जाणार आहे. या फोनमध्ये एआय समरी, एआय रेकॉर्डर आणि एआय स्टुडिओसह अनेक एआय आधारित फीचर्स दिले जाण्याची शक्यता आहे.

शक्तीशाली बॅटरी मिळणार

ओप्पोच्या या स्मार्टफोनमध्ये 6000mAh बॅटरी मिळणार आहे. हो फोन 45 वॉट सुपरव्हीओसी फास्ट चार्जिंग सपोर्ट करणार आहे. या फोनमध्ये 50 एमपी एआय मेन कॅमेरा मिळणार आहे. तसेच फोनच्या मागील बाजूस आणखी एक कॅमेरा दिला जाणार आहे. तसेच या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 13 एमपी कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे.

Oppo K13x 5G हा स्मार्टफोन AM04 हाय स्ट्रेंथ अॅल्युमिनियम अलॉय बॉडीसह येण्याची शक्यता आहे. तसेच या फोनला मिलिटरी ग्रेड एमआयएल-एसटीडी-810-एच शॉक रेझिस्टन्स बॉडी मिळेल. हा फोन आयपी65 रेटेड असू शकतो, ज्यामुळे फोन पाणी आणि धुळीमुळे खराब होणार नाही.

6.67-इंचाचा डिस्प्ले मिळणार

ओप्पोच्या या स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाचा मोठा HD+ डिस्प्ले मिळू शकतो, जो 120Hz हाय रिफ्रेश रेट फीचरला सपोर्ट करेल. हा फोन साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह येणार आहे. यात स्प्लॅश टच आणि ग्लोव्ह टच मोड असणार आहेत अशी माहिती समोर आली आहे.