Oppo उत्पादनांचा वर्षाव करणार! Oppo Reno 8 सीरिज, पहिला टॅबलेट आज लाँच होणार, अधिक जाणून घ्या…

| Updated on: Jul 18, 2022 | 2:03 PM

Reno 8 Pro हा या मालिकेतील टॉप-एंड फोन आहे. MediaTek Dimension 8100 Max चिपसेटसह येतो. यात 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले, मागील कॅमेरामध्ये 50 मेगापिक्सल्सचा ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे.

Oppo उत्पादनांचा वर्षाव करणार! Oppo Reno 8 सीरिज, पहिला टॅबलेट आज लाँच होणार, अधिक जाणून घ्या...
Oppo उत्पादनांचा वर्षाव करणार!
Image Credit source: social
Follow us on

मुंबई : Oppo Reno 8 मालिका आज भारतीय (India) बाजारपेठत लाँच होणार आहे. या सीरीज अंतर्गत Oppo Reno 8 आणि Oppo Reno 8 Pro हे दोन फोन (Phone) सादर केले जाणार आहेत. या सीरीज व्यतिरिक्त कंपनी आपला पहिला टॅबलेट देखील लाँच करणार आहे. याशिवाय नवीन ट्रू वायरलेस इयरबड्स Enco X2 देखील लाँच केले जातील. ही उत्पादने लाँच करण्यापूर्वी Oppo Reno 8 मालिका लाँच इव्हेंटचे सर्व संभाव्य तपशील जाणून घ्या. Oppo Reno 8 मालिकेचे दोन फोन (smartphone) भारतात लाँच होणार आहेत. यामध्ये Oppo Reno 8 आणि Reno 8 Pro यांचा समावेश असेल. दोन्ही 5G फोन आहेत, परंतु त्यांच्यामध्ये हे एकमेव वैशिष्ट्य नाही. पहिल्यांदाच, Oppo Reno 8 फोन कंपनीच्या पहिल्या न्यूरल प्रोसेसिंग युनिटसह येईल. हे NPU म्हणून ओळखले जाते. Reno 8 Pro उत्तम फोटोग्राफीसाठी Marisilicon X NPU चा वापर करते. Reno 8 Pro ची रचना Find X रेंज सारखीच आहे.

कधी आहे लाँचिंग सोहळा?

Oppo Reno 8 Series चा लाँचिंग इव्हेंट आज संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. या इव्हेंटमधून रिअल-टाइम अपडेट्स मिळवण्यासाठी तुमच्यासाठी थेट प्रवाह असेल.

हायलाईट्स

  1. Oppo Reno 8 मालिकेचे दोन फोन भारतात लाँच होणार
  2. यामध्ये Oppo Reno 8 आणि Reno 8 Pro यांचा समावेश असेल
  3. हे सुद्धा वाचा
  4. दोन्ही 5G फोन आहेत, परंतु त्यांच्यामध्ये हे एकमेव वैशिष्ट्य नाही
  5. पहिल्यांदाच, Oppo Reno 8 फोन कंपनीच्या पहिल्या न्यूरल प्रोसेसिंग युनिटसह येईल
  6. हे NPU म्हणून ओळखले जाते
  7. Reno 8 Pro उत्तम फोटोग्राफीसाठी Marisilicon X NPU चा वापर करते
  8. Reno 8 Pro ची रचना Find X रेंज सारखीच आहे.

Oppo Reno 8 मालिकेची वैशिष्ट्ये

Reno 8 Pro हा या मालिकेतील टॉप-एंड फोन आहे, जो MediaTek Dimension 8100 Max चिपसेटसह येतो. यात 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे. याच्या मागील कॅमेरामध्ये ५० मेगापिक्सल्सचा ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. सेल्फीसाठी 32-मेगापिक्सल कॅमेरा आहे. Reno 8 Pro 12GB पर्यंत RAM आणि 256GB स्टोरेज ऑफर करेल अशी अपेक्षा आहे. यात 80W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट असलेली 4500mAh बॅटरी दिली जाऊ शकते.