AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maruti Grand Vitara : मारुती ग्रँड विटाराचं लवकरच लाँचिंग, किंमतीसह आकर्षक फीचर्स जाणून घ्या….

मारुतीने ग्रँड विटारानं टीझर रिलीज केलंय. या टीझर्समध्ये या एसयूव्हीचे हायटेक फीचर्स दाखवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ग्रँड विटारा हायब्रिड इंजिनसह ते कारमध्ये मिळतील. जाणून घ्या फीचर

Maruti Grand Vitara : मारुती ग्रँड विटाराचं लवकरच लाँचिंग, किंमतीसह आकर्षक फीचर्स जाणून घ्या....
maruti grand vitaraImage Credit source: social
| Updated on: Jul 18, 2022 | 12:28 PM
Share

मुंबई : अवघ्या काही तासांच्या प्रतीक्षेनंतर, मारुतीच्या ऑल न्यू ग्रँड विटारावरून (Maruti Grand Vitara) पडदा उघड होईल. होय, ही SUV 20 जुलै रोजी लाँच होत आहे. हे Nexa डीलरशिप वरून विकले जाईल. मारुतीने (Maruti) यासंदर्भात अनेक छोटे टीझर जारी केले आहेत.या टीझर्समध्ये या एसयूव्हीचे (SUV) प्रगत आणि हायटेक फीचर्स दाखवण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे ग्रँड विटारा हायब्रिड इंजिनसह येईल. कंपनीने त्याचे बुकिंग आधीच सुरू केले आहे. तुम्ही 11,000 रुपयांच्या टोकन रकमेसह ते बुक करू शकता. CarPrice वेबसाइटनुसार, त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 9.50 लाख रुपये असेल. कंपनीने या SUV च्या कोणत्या फीचर्सचा खुलासा केला आहे ते पाहुया…

टीझर पाहा

हायब्रीड इंजिन

मारुती ग्रँड विटारामध्ये हायब्रीड इंजिन उपलब्ध असेल. हायब्रीड कारमध्ये दोन मोटर्स वापरल्या जातात. यात पहिले पेट्रोल इंजिन आहे जे सामान्य इंधन इंजिन असलेल्या कारसारखे आहे. दुसरे म्हणजे इलेक्ट्रिक मोटर इंजिन, जे तुम्हाला इलेक्ट्रिक वाहनांमध्ये पाहायला मिळते. या दोन्हीची शक्ती वाहन चालवण्यासाठी वापरली जाते. जेव्हा कार इंधन इंजिनवर चालते. तेव्हा तिच्या बॅटरीला देखील उर्जा मिळते, ज्यामुळे बॅटरी आपोआप चार्ज होते. गरजेच्या वेळी अतिरिक्त शक्ती म्हणून ते इंजिनाप्रमाणे उपयोगी पडते.

ईव्ही आणि ड्राइव्ह मोड

ग्रँड विटाराच्या टीझरवरून हे स्पष्ट होते की या कारला ईव्ही मोड मिळेल. ईव्ही मोडमध्ये, कार पूर्णपणे इलेक्ट्रिक मोटरद्वारे चालविली जाते. कारची बॅटरी इलेक्ट्रिक मोटरला ऊर्जा देते आणि इलेक्ट्रिक मोटर चाकांना शक्ती देते. ही प्रक्रिया शांत आहे. त्यात कोणताही आवाज नाही. हायब्रिड मोडमध्ये, कारचे इंजिन इलेक्ट्रिक जनरेटरचे काम करते आणि इलेक्ट्रिक मोटर कारची चाके चालवते.

टायर प्रेशर फीचर

ग्रँड विटाराच्या कोणत्या टायरमध्ये किती हवा आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला कारच्या स्क्रीनवर मिळेल. होय, यात टायरचे दाब तपासण्याचे वैशिष्ट्य असेल. टायरमध्ये हवा कमी असल्यास त्याची माहिती आपोआप मिळते.तुम्ही टायर्सची हवा मॅन्युअली तपासण्यास देखील सक्षम असाल.

360 डिग्री कॅमेरा

मारुती आपल्या कारच्या नवीन मॉडेलमध्ये 360 डिग्री कॅमेराची सुविधा देत आहे. हे फिचर ग्रँड विटारामध्येही उपलब्ध असेल. त्यामुळे ड्रायव्हरला गाडी चालवण्यास अधिक मदत होईल. यामुळे ड्रायव्हरला केवळ अडगळीच्या जागेत गाडी पार्क करण्यास मदत होणार नाही तर अंध रस्त्यांवरील अडचणी टाळण्यासही मदत होईल.तुम्ही स्क्रीनवर कारच्या आजूबाजूचे दृश्य पाहू शकाल.

पॅनोरामिक सनरूफ

मारुतीने नुकत्याच लाँच झालेल्या न्यू ब्रेझामध्ये पॅनोरामिक सनरूफ दिले आहे. तसेच हे फीचर असलेली कंपनीची ही पहिली कार ठरली आहे.अशा परिस्थितीत आता ग्रँड व्हिटारालाही पॅनोरॅमिक सनरूफ मिळणार आहे. त्याचा आकार किती मोठा असेल,  हे लॉन्चिंगनंतरच कळेल. हे स्वयंचलित वैशिष्ट्यासह येईल.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.