
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये विस्तव सुद्धा जात नाही. दोन्ही देशात केव्हाही यु्द्धाला तोंड फुटेल असा दावा पाकिस्तानी मंत्री करत आहेत. अशावेळी गुगलवर पाकिस्तानमधील नागरीक काय सर्च करतायेत, याविषयीची चर्चा होत आहे. पाकिस्तानची सर्च हिस्ट्री बरंच काही सांगून जाते. पाकिस्तानात भारतीय तंत्रज्ञान, बॉलिवूड अभिनेते आणि खेळाविषयी खूप काही सर्च करण्यात आले आहे. गुगलने गेल्या काही वर्षात भारतात अधिक रस दाखवला आहे.
वर्ष 2024 डिसेंबर महिन्यात एक अहवाल समोर आला आहे. पाकिस्तानमधील गुगलवर अनेक विषय सर्च, शोधण्यात आले आहेत. शेजारील देशातील गुगलची याविषयीची हिस्ट्री समोर आली आहे. त्यानुसार, त्यांचा ओढा भारताकडेच आहे. भारतातील खेळ, मनोरंजन, तंत्रज्ञान आणि भारतीय सेलिब्रिटींविषयी सर्च केल्याचे दिसून आले.
क्रिकेटविषयी सर्वाधिक सर्च
पाकिस्तानी नागरिकांनी गुगलवर क्रिकेट हा विषय सर्वाधिक सर्च केला आहे. गुगल सर्च हिस्ट्रीवर नजर टाकल्यास हे स्पष्ट होईल. पाकिस्तानने टी20 वर्ल्ड कप 2024 विषयी पाकिस्तानींनी सर्वाधिक माहिती घेतली आहे. पाकिस्तान सुपर लीग (PSL) 2024 चे वेळापत्रक आणि जागतिक क्रिकेट सामन्यांची सविस्तर माहिती शोधण्यात आली आहे.
गुगल सर्च हिस्ट्री
मुकेश अंबानीपासून यांचे नाव सर्च हिस्ट्रीत
पाकिस्तानी नागरिकांनी भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याविषयी माहिती घेतली आहे. अंबानी याची मालमत्ता, त्यांचे उद्योग आणि त्यांची जीवनशैली, त्यांचे अँटालिया हे आलिशान घर याविषयी माहिती घेण्यात आली आहे. याशिवाय भारतीय बॉलिवूडचे चित्रपट, वेब सीरीज, हिरामंडी, मिर्झापूर सीजन -3, स्त्री-2 याविषयी सर्वाधिक गोष्टी सर्च करण्यात आल्या आहेत.
याशिवाय तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची प्रगती, ओपन एआयचे ChatGPT लॉगिन, बिंग इमेज क्रिएटर, iPhone 16 Pro Max आणि Redmi Note 13 स्मार्टफोनविषयीची माहिती सर्च करण्यात आली आहे. How to सर्च हिस्ट्रीमध्ये सुद्धा पाकिस्तानीनी अनेक विचित्र गोष्टी सर्च केल्याचे समोर आले आहे. यामध्ये आजी मरण्यापूर्वी लखपती कसे व्हावे. विना गुंतवणूक श्रीमंत कसे व्हावे अशा गोष्टी सर्च करण्यात आल्या आहेत.