6300mAh बॅटरीसह Realme Narzo 80 Lite 4G लाँच, मोटोरोला-विवोला देणार टक्कर

तुम्हालाही स्मार्टफोन खरेदी करायचा आहे, पण तुमचे बजेट कमी आहे, तर आता तुम्ही उत्तम फीचर्स असलेला फोन खरेदी करू शकता. तर Realme ने तुमच्यासाठी Narzo 80 Lite 4G स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनची खास गोष्ट म्हणजे कमी बजेटमध्ये लाँच झाला आहे. चला तर मग जाणून घेऊयात या फोनचे खास फिचर्स आणि किंमत.

6300mAh बॅटरीसह Realme Narzo 80 Lite 4G लाँच, मोटोरोला-विवोला देणार टक्कर
Realme Narzo 80 Lite 4g
Image Credit source: Realme
| Edited By: | Updated on: Jul 26, 2025 | 1:53 AM

आजच्या डिजिटल युगात प्रत्येकाकडे स्मार्टफोन असणे गरजेचं बनलेलं आहे. त्यात तुम्हालाही नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा आहे, पण तुमचं बजेट कमी आहे तर आता चिंता करण्याची गरज नाहीये. कारण कमी बजेटच्या ग्राहकांसाठी, Realme ने 9,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत नवीन Realme Narzo 80 Lite 4G स्मार्टफोन लाँच केला आहे. गेल्या महिन्यात लाँच झालेल्या Narzo 80 Lite 5G चा हा 4G प्रकार आहे. Realme च्या या नवीनतम स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 90Hz डिस्प्ले, रिव्हर्स वायर्ड चार्ज सपोर्ट, पॉवरफुल 6300 mAh बॅटरी आणि 18 GB पर्यंत रॅम सपोर्ट मिळेल. चला जाणून घेऊया या फोनची विक्री कोणत्या दिवशी सुरू होईल आणि या फोनमध्ये तुम्हाला कोणते खास फीचर्स मिळतील.

Realme Narzo 80 Lite 4G ची किंमत

या फोनच्या 4 जीबी/64 जीबी व्हेरिएंटची किंमत 7,299 रुपये आहे, परंतु लाँच ऑफर्स अंतर्गत, तुम्ही 700 रुपयांच्या कूपन डिस्काउंटचा फायदा घेऊन हा हँडसेट 6,599 रुपयांना खरेदी करू शकता. त्याचवेळी, 6 जीबी/128 जीबी असलेल्या या फोनच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 8,299 रुपये आहे, जर तुम्ही हा फोन खरेदी केला तर तुम्हाला 700 रुपयांची कूपन डिस्काउंट मिळेल, त्यानंतर तुम्हाला हा फोन 7,599 रुपयांना मिळेल.

उपलब्धतेबद्दल बोलायचे झाले तर, या फोनची विक्री ग्राहकांसाठी 31 जुलै रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल, तुम्ही हा फोन Amazon आणि Realme च्या अधिकृत साइटवरून खरेदी करू शकता. या किंमत श्रेणीमध्ये, Realme चा हा नवीनतम फोन Motorola G05 (किंमत 7,299रुपये), Vivo V19E (किंमत 7,999 रुपये) सारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करेल.

Realme Narzo 80 Lite 4G ची फिचर्स

डिस्प्ले: या फोनमध्ये 6.67 इंचाचा एचडी प्लस एलसीडी स्क्रीन आहे जो 90 हर्ट्झ रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो.

चिपसेट: हा हँडसेट 1.8 GHz Unisoc T7250 ऑक्टा कोर प्रोसेसरने सुसज्ज आहे, तसेच चांगल्या ग्राफिक्ससाठी Mali G57 MP1 GPU देखील आहे.

बॅटरी: 15W फास्ट चार्ज सपोर्टसह, या Realme स्मार्टफोनमध्ये 6W रिव्हर्स वायर्ड चार्ज सपोर्ट देखील आहे.

रॅम: फोनमध्ये 4 जीबी आणि 6 जीबी रॅम असला तरी, हा फोन 12जीबी पर्यंत व्हर्च्युअल रॅम सपोर्टसह येतो. याचा अर्थ असा की या बजेट फोनमध्ये तुम्हाला 18 जीबी पर्यंत रॅम सपोर्ट मिळेल.

कॅमेरा सेटअप: फोनच्या मागील बाजूस 13-मेगापिक्सेलचा ड्युअल रियर कॅमेरा आणि समोर 5-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा सेन्सर असेल.