50 मेगापिक्सेलचा कॅमेरा, स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह Samsung Galaxy M47 5G भारतात या दिवशी होणार लाँच
सॅमसंगने आपल्या लोकप्रिय एम-सिरीजमधील नवीनतम स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी एम47 5जी च्या भारतातील लाँचची तारीख निश्चित केली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार हा बजेट-फ्रेंडली फ्लॅगशिप फोन या महिन्याच्या अखेरीस भारतात दाखल होईल. चला तर मग आजच्या लेखात या फोनची लाँच तारीख जाणून घेऊयात.

Samsung Galaxy M47 5G या महिन्याच्या अखेरीस भारतात लाँच केला जाणार आहे. फोन लाँच होण्याआधीच कंपनीने आगामी गॅलेक्सी एम सीरीज स्मार्टफोनचे कलर ऑप्शन्स, डिझाइन आणि प्रमुख स्पेसिफिकेशन्सचीही पुष्टी केली आहे. या हँडसेटमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सिस्टीम असेल. याशिवाय हा फोन देशात दोन कलर ऑप्शन्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल. Samsung Galaxy M47 5G मध्ये स्नॅपड्रॅगन चिपसेट, LPDDR5x RAM आणि UFS 3.1 ऑनबोर्ड स्टोरेज असणार आहे. या फोनमध्ये सॅमोलेड (sAMOLED) स्क्रीन असेल, जी 120 हर्ट्झ पर्यंतच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. चला तर मग या फोनची लाँच तारीख आणि फिचर्स जाणून घेऊयात.
Samsung Galaxy M47 5G या दिवशी भारतात होणार लाँच
29 जून 2026 रोजी भारतात सॅमसंगचा आगामी सॅमसंग गॅलेक्सी M47 5G हा फोन लाँच होणार आहे. तसेच कंपनीकडून या फोनसाठीची समर्पित मायक्रोसाईट अद्ययावत करण्यात आली असून लाँचच्या तारखेसोबतच मायक्रोसाईटवरून हे देखील उघड झाले आहे की, गॅलेक्सी M47 5G भारतात ब्लेझ ब्लू आणि रोग रेड या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. डिझाइनच्या बाबतीत बोलायचे झाल्यास हा हँडसेट नवीनतम गॅलेक्सी ए सिरीजच्या फोन्सप्रमाणेच, फ्लॅट रिअर कॅमेरा आणि पिल-शेप्ड कॅमेरा मॉड्यूलसह येत असल्याचे दिसते.
तसेच या फोनच्या फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, सॅमसंग गॅलेक्सी M47 5G मध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन चिपसेट असेल (ज्याचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही). या हँडसेटमध्ये LPDDR5x रॅम आणि UFS 3.1 इंटर्नल स्टोरेज देखील असेल. या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिला ग्लास व्हिक्टस+ संरक्षणासह 6.7-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले असेल.
सॅमसंगने त्यांच्या आगामी स्मार्टफोनसाठी सहा ओएस अपग्रेड आणि सहा वर्षांच्या सुरक्षा अपडेट्सचे आश्वासन दिले आहे. Samsung Galaxy M47 5G हा सॅमसंगच्या वन यूआय 8.5 सह येईल, जे अँड्रॉइड 16 वर आधारित आहे. नवीनतम सॉफ्टवेअरसोबतच या फोनमध्ये एआय व्हॉइस ट्रान्सक्रिप्शनसारखी अनेक एआय टूल्सही मिळतील.
कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, सॅमसंग गॅलेक्सी M47 5G भारतात ट्रिपल रियर कॅमेरा सिस्टीमसह लाँच होणार असल्याची पुष्टी झाली आहे. या हँडसेटमध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सह 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा असेल. याव्यतिरिक्त, यात ५-मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर असेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी, पंच-होल डिस्प्ले कटआउटमध्ये 12-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. सॅमसंगचा दावा आहे की हा फोन 4K व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सक्षम असेल.
सॅमसंग गॅलेक्सी M47 5G हा 45W वायर्ड फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह सादर होईल. इतकेच नाही तर यात बायपास चार्जिंगचा सपोर्ट देखील असेल, ज्यामुळे फोनच्या बॅटरीवरील अतिरिक्त ताण कमी होतो असा दावा केला जात आहे. तसेच हा हँडसेट 4 पट स्क्रॅच प्रतिरोधक असेल आणि 2 मीटर उंचीवरून पडल्यास फोन सुरक्षित राहील.