Smartphone : स्मार्टफोन गरम होत आहे? तुम्ही या 4 चुका करत असाल तर मोबाईलचा स्फोट होऊ शकतो

| Updated on: Apr 30, 2022 | 1:25 PM

मोबाईल थेट सूर्यप्रकाशात राहिला तर तो जास्त गरम होऊ शकतो. थेट सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी तुमचा फोन चार्ज करण्यासाठी ठेवणं चुकीचं आहे.

Smartphone : स्मार्टफोन गरम होत आहे? तुम्ही या 4 चुका करत असाल तर मोबाईलचा स्फोट होऊ शकतो
स्मार्टफोनचा ‘स्मार्ट’ वापर करा
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई : आजच्या काळात स्मार्टफोन (Smartphone) खूप जास्त गरजेचा झालाय. आपण एक मिनिटही आपल्या स्मार्टफोनशिवाय नाही राहू शकत. एकवेळ तरुण मंडळी जेवण करणार नाही. पण स्मार्टफोन चारवेळेस हाताळतील, अशी अवस्था सध्या चहुकडे दिसतेय. मात्र, आता उन्हाळा असल्याने आणि तापमान (temperature) अधिक वाढत असल्याने अनेकांचा स्मार्टफोन गरम होत असल्याचं दिसून येतंय. बाहेरच्या वाढत्या तापमानाचा स्मार्टफोनवर अधिक परिणाम होत आहे. उष्णतेमुळे तुमच्या फोनमधील (phone) प्रत्येक घटकावर मोठा परिणाम होऊ शकतो. याचा परिणाम दीर्घकाळासाठी होऊ शकतो. डेटा जाण्याचाही धोका संभवतो. बॅटरी देखील लवकर उतरते. आता यावर आम्ही तुम्हाला काही मोबाईल टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचा फोन उन्हाळ्यात तुम्ही अगदी आरामात ऑपरेट करू शकतात.

फोन सूर्यप्रकाशात ठेवू नका

मोबाईल थेट सूर्यप्रकाशात राहिला तर तो जास्त गरम होऊ शकतो. थेट सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी तुमचा फोन चार्ज करण्यासाठी ठेवणं चुकीचं आहे. चार्जिंगमधील उष्णता आणि सूर्यप्रकाशामुळे फोनच्या अंतर्गत भागांना त्याचं  नुकसान होऊ शकतं.

फोन गरम झाल्यास काय करणार?

फोन तुमचा उन्हात ठेऊ नका. फोन जास्त उष्णतेच्या कुठल्याही ठिकाणी ठोऊ नका. शक्य तेवढं तो थंड किंवा सावलीच्या ठिकाणी ठेवा. सतत चार्जिंग लावून देखील ठेवू नका. याने देखील फोन खराब होण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे ते टाळायला हवं.

हे सुद्धा वाचा

फोनसाठी कूलिंग फॅन विकत घ्या

तुम्ही नियमितपणे गेम खेळत असाल किंवा जास्त वेळ फोन वापरत असाल. तर तुमच्या फोनसाठी फॅन असणं हा योग्य पर्याय असू शकतो. आजकाल फोनसाठी कूलिंग फॅन्स अनेक उपयोगांसाठी वेगवेगळ्या डिझाइनमध्ये येतात. त्यापैकी बरेच जण स्मार्टफोनच्या मागील बाजूस लावण्यासाठी क्लॅम्पिंग वापरतात, परंतु जर तुम्ही मॅगसेफ चार्जिंग क्षमतेसह आयफोन डिव्हाइस वापरत असाल तर मागील बाजूस जोडलेला कूलिंग फॅन शोधणे फार कठीण होणार नाही.