
तुमच्यापैकी जवळपास सर्वांच्या फोनमध्ये यूएसबी टाइप सी पोर्ट असेल. याचा उपयोग तुम्ही फक्त चार्जिंगसाठी करत असाल. मात्र तुम्ही त्याचा वापर इतरही 5 प्रकारच्या कामांसाठी करू शकता. आम्ही आज तुम्हाला सांगत असलेल्या पद्धती आपत्कालीन परिस्थितीत उपयुक्त ठरू शकतात. टाईप सी पोर्टच्या मदतीने फोन वेगाने चार्ज होतो, तसेच वेगाने डेटा ट्रान्सफर करण्यास फायदेशीर सी पोर्ट फायदेशीर आहे. या पोर्टच्या मदतीने तुम्ही पुढील 5 कामे करू शकता.
यूएसबी टाइप सी पोर्टच्या मदतीने तुम्ही तुमच्या स्मार्टफोनचे स्टोरेज वाढवू शकता. तुम्ही यूएसबी टाइप सी ओटीजी फीचर वापरून पोर्टेबल हार्ड ड्राइव्ह म्हणून वापरू शकता. तुम्ही सी पोर्टला केबल किंवा पेन ड्राइव्हशी कनेक्ट करून डेटा ट्रान्सफर करू शकता. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या फोनवरून लॅपटॉपवर किंवा तुमच्या लॅपटॉपवरून तुमच्या फोनवर डेटा ट्रान्सफर करू शकता.
अनेक स्मार्टफोन रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करतात. रिव्हर्स चार्जिंग फीचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या फोनवरून दुसरा फोन किंवा डिव्हाइस चार्ज करू शकता. यासाठी तुम्हाला टाइप सी ते टाइप सी केबलची आवश्यकता असेल. ही केबल तुमच्या फोनवरून दुसरा फोन, इअरबड्स, नेकबँड इत्यादी चार्ज करण्यास मदत करेल. म्हणजेच अडचणीच्या काळात तुम्ही तुमच्या फोनला पॉवर बँक बनवू शकता.
स्मार्टफोनच्या यूएसबी टाइप सी पोर्टशी स्ट्रीमिंग डिव्हाइस कनेक्ट करता येतात. यामुळे तुम्ही फोनची स्क्रीन टीव्हीवरही पाहू शकता. यामुळे तुम्हाला तुमच्या फोनमधील माहिती मोठ्या स्क्रीनवर पाहता येईल. जो एक अनोखा अनुभव असेल.
तुमच्या मोबाईलमध्ये असलेल्या टाइप सी पोर्टद्वारे फोनशी कीबोर्ड आणि माउस कनेक्ट करू शकता. यामुळे तुमचा फोन मिनी लॅपटॉपसारखा काम करू शकतो. सॅमसंग फोनमध्ये डेक्स फीचर आहे, ज्यामुळे तुमच्या फोनचा इंटरफेस पीसीसारखा दिसतो.
स्मार्टफोनमध्ये असलेल्या यूएसबी टाइप सी पोर्टला ऑडिओ पेरिफेरल्स कनेक्ट करून म्युझिक सिस्टम देखील कनेक्ट करू शकता. तसेच या पोर्टचा वापर टाइप-सी पोर्टसह इयरफोन किंवा हेडफोन कनेक्ट करू शकता. तसेच तुम्ही एचडीएमआय हब देखील कनेक्ट करू शकता, यामुळे प्रोजेक्टरद्वारे तुमचा फोन वापरू शकता. चार्जिंग व्यतिरिक्त ही इतरही कामे तुम्ही यूएसबी टाइप सी पोर्टच्या मदतीने करू शकता.