Tata Company : सेमिकंडक्टरपासून ते iphone पर्यंत Tata कंपनीची इलेक्ट्रॉनिक्समध्ये मोठी गुंतवणूक ; गुंतवणुकीचा आकडा पाहून व्हाल हैराण

Tata Electronicsने आर्थिक वर्ष २०२६ मध्ये आपल्या उपकंपन्यांमधील इक्विटी गुंतवणूक ३,७२७ कोटी रुपयांपर्यंत वाढवली आहे. यातील मोठा हिस्सा सेमीकंडक्टर व्यवसायाकडे वळवण्यात आला आहे.

Tata Company : सेमिकंडक्टरपासून ते  iphone पर्यंत Tata कंपनीची इलेक्ट्रॉनिक्समध्ये मोठी गुंतवणूक ; गुंतवणुकीचा आकडा पाहून व्हाल हैराण
tata company investment
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 30, 2026 | 3:32 PM

iPhone च्या उत्पादनापासून ते सेमीकंडटर चिप बनवण्यापर्यंत tata कंपनीने आपले विस्तार वेगाने वाढवण्यास सुरूवात केली आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २०२६ मध्ये आपल्या विविध उपकंपन्यानमधील इक्किटी गुंतवणूक 3,727 कोटी रुपयांवर पोहोचवली आहे. मार्च २०२६ पर्यंत ही गुंतवणूक तब्बल तीन पटीने वाढली आहे. मार्च 2026 पर्यंत ही गुंतवणूक 3,727 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये हा आकडा सुमारे 1,200 कोटी रूपये होता. कंपनीच्या ताज्या रेग्युलेटरी फायलिंगमधून ही माहिती समोर आली आहे.

tata electronics चा सध्या iPhone मॅन्युफॅक्चरिंगसोबत सेमीकंडक्टर क्षेत्रावरही मोठा फोकस आहे. कंपनीने आपल्या उपकंपन्याना आर्थिक मदत देण्यासाठी 61,280 कोटी रूपयांची कॉर्पोरेट गॅरेंटी दिली आहे. याशिवाय वर्किंग कॅपिटल आणि इतर गरजांसाठी १,017 कोटी रूपयांचे इंटर- कॉर्पोरेट लोनही देण्यात आले आहे.

Loading...

सेमीकंडक्टरमध्ये मोठी गुंतवणूक ं

Tata electronics च्या वाढलेल्या गुंतवणूकीतील मोठा हिस्सा सेमीकंडक्टर व्यवसायाकडे वळवण्यात आला आहे. आर्थिच वर्ष 2026 मध्ये tata semicondutors मध्ये 1,501 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. विशेष म्हणजे आर्थिक वर्ष 2025 मध्ये या कंपनीमध्ये कोणतीही इक्किटी गुंतवणूक करण्यात आली नव्हती. याशिवाय tata semicondutors assembly आणि test मध्येही मोठी वाढ झाली आहे. या कंपनीतील गुंतवणूक 50 कोटी रुपयांवरून थेट 954 कोटी रूपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे भारतात चिप मॅन्युफॅक्चरिंग आणि चिप असेंब्लीचा व्यवसाय उभारण्यावर tata electroniocs चा मोठा भार असल्याचं दिसतं.

कंपनीवर कर्जाचाही भार वाढला

व्यवसायाचा विस्तार करत असताना tata electronics च्या एकूण कर्जातही वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2026  मध्ये कंपनीचे एकूण ग्रॉस डेट 71 टक्क्यांनी वाढून 11,718 कोटी रूपयांवर पोहोचले. दरम्यान tata sons ने सप्टेंबर आणि मार्चमध्ये कंपनीत मिळून 3,000 कोटी रुपयांची नवीन इक्किटी गुंतवणूक केली.

iPhone उत्पादनात मोठी भूमिका

tata electronics आता apple च्या iPhone उत्पादनाच्या जागतिक नेटवर्कमधून तयार होणाऱ्या सुमारे 12 टक्के iPhone चे उत्पादन करते. भारतात कंपनीने iPhone असेंब्ली आणि संबंधित घटकांच्या उत्पादनातही आपली क्षमता वाढवली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us