Apple चा नवीन आयफोन पाहिलात का? दमदार फीचर्स, मोठा डिस्प्ले अन्‌ बरंच काही…

| Updated on: Sep 07, 2022 | 7:55 PM

आयफोन 14 मॅक्सच्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये मोठ्या आकाराचा डिस्प्ले दिला जाणार असल्याचे बोलले जात आहे. अपकमिंग आयफोनचा डिस्प्ले हा आयफोन 14 पेक्षा जास्त मोठा असेल.

Apple चा नवीन आयफोन पाहिलात का? दमदार फीचर्स, मोठा डिस्प्ले अन्‌ बरंच काही…
Apple चा नवीन आयफोन पाहिलात का?
Follow us on

ॲप्पलकडून (Apple) आज रात्री एक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. त्यामध्ये ते आपला नवीन आयफोन (iPhone) लॉन्च करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आयफोन 14 सीरीज अंतर्गत येणारा iPhone 14 Max हा प्रीमियम सेक्शनमधील फोन असेल. त्यात अनेक खास फीचर्स पाहायला मिळतील. याशिवाय Apple Watch 8, Watch 8 Pro आणि आयपॅड (iPad) देखील ऑफर केले जातील. यामध्ये बजेट आयपॅडही दिला जाऊ शकतो. ॲप्पल iPhone 14, iPhone 14 Pro, iPhone 14 Pro Max, iPhone 14 Pro Max Ultra लॉन्च करू शकते. या लेखाच्या माध्यमातून आपण iPhone 14 Max च्या संभाव्य फीचर्स आणि कॅमेरा सेटअपबद्दल माहिती घेणार आहोत.

काय आहेत स्पेसिफिकेशन्स

आयफोन 14 मॅक्सच्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये मोठ्या आकाराचा डिस्प्ले दिला जाईल, हा डिस्प्ले आयफोन 14 पेक्षाही मोठा असेल. मात्र, समोरच्या बाजूने त्यात फारसे बदल केले जाणार नाहीत. याशिवाय, यामध्ये iPhone 14 प्रमाणेच स्पेसिफिकेशनचा वापर करण्यात आला आहे. iPhone 14 Max मध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले आहे. इनहाऊस चिपसेट A15 वापरला जाईल.

किती असणार किंमत

iPhone 14 Max ची संभाव्य किंमत iPhone 13 सारखी असू शकते. iPhone 14 ची सुरुवातीची किंमत 80,000 ते 85000 रुपयांपर्यंत असू शकते. या किमतीची माहिती लीक रिपोर्ट्सवरून उपलब्ध आहे.

हे सुद्धा वाचा

Apple Watch होणार दाखल

ॲप्पल वॉचबाबतही अनेक लीक्ससमोर आले आहेत. लीक्स रिपोर्ट्सनुसार, Apple Watch या वर्षी स्वतःच्या GPS फीचर्ससह लॉन्च होऊ शकते. या नवीन फीचर्समुळे युजर्सना फिटनेस ट्रॅकिंग आदींमध्ये मदत मिळते. या सोबतच अनेक नवीन सेंसर आणि उत्तम स्क्रीन प्रोटेक्शन पाहायला मिळणार आहे. सर्व प्रोडक्टची किंमत आणि अधिकृत फीचर्स जाणून घेण्यासाठी ग्राहकांना काही काळाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.