
फ्लिपकार्ट बाय बाय सेल 2025 सुरू झाला आहे. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्ट सेल दरम्यान तुमच्याकडे कमी किमतीत प्रीमियम फीचर्स असलेला फोन खरेदी करण्याची उत्तम संधी आहे. एसबीआयने या सेलसाठी एसबीआयसोबत भागीदारी केली आहे म्हणजेच तुम्ही जर फोन खरेदी करताना एसबीआय कार्डने पैसे भरले तर तुम्हाला फोनवरील सवलतीव्यतिरिक्त 10% इन्स्टंट डिस्काउंटचा लाभ घेता येईल. चला तर मग आजच्या लेखात आपण या सेलमध्ये उपलब्ध असलेल्या प्रीमियम स्मार्टफोन व त्यांच्या किमतीबद्दल जाणून घेऊयात.
फ्लिपकार्टवर 4.5 रेटिंगसह सूचीबद्ध असलेला हा सॅमसंग स्मार्टफोन फ्लिपकार्ट सेल दरम्यान 46% च्या मोठ्या सवलतीत 31,999 रूपयांमध्ये विकला जात आहे. हा फोन नो-कॉस्ट ईएमआय पर्यायांसह तुम्ही खरेदी करू शकता, जो दरमहा 5,333 पासून सुरू होतो.
या फोनमध्ये 6.7 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या हँडसेटमध्ये एक्सिनोस 2400 ई प्रोसेसर, 4700 एमएएचची पॉवरफूल बॅटरी, 50 मेगापिक्सेल प्रायमरी रिअर, 12 मेगापिक्सेल सेकंडरी कॅमेरा आणि 10 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे.
सेल दरम्यान फ्लॅगशिप फीचर्स असलेला हा मोटोरोला स्मार्टफोन 9% डिस्काउंटवर 49,999 रुपयांना विकला जात आहे. या किमतीत तुम्हाला 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट मिळेल. फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 प्रोसेसर, 50 मेगापिक्सेलचा ड्युअल रिअर कॅमेरा, 32 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा, 6.9 इंचाचा एचडी+ डिस्प्ले आणि 4500 एमएएचची पॉवरफूल बॅटरी आहे.
स्मार्टफोनवरील सवलतींव्यतिरिक्त तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून एक्सचेंज सवलतींचा आणि बँक कार्ड पेमेंटवर अतिरिक्त सवलतींचा लाभ घेऊ शकता. या दोन स्मार्टफोन्स व्यतिरिक्त, इतर अनेक मॉडेल्सवर देखील लक्षणीय सवलती मिळत आहेत. सेल दरम्यान केवळ फोनच नाही तर टीव्ही आणि लॅपटॉपसह विविध उत्पादने देखील सवलतीत विकली जात आहेत.