गुगलचा ‘हा’ नवीन फिचर तुमचा जुना जीमेल आयडी बदलण्याची देणार परवानगी

बऱ्याच प्रतीक्षेनंतर गुगलने तुमचा जीमेल आयडी बदलण्यासाठी एक नवीन फीचर आणण्यास सुरुवात केली आहे. सध्या हे फीचर येणाच्या तयारीत आहेत. तुम्हाला हे फीचर मिळायला सुरुवात झाली आहे की नाही हे आजच्या लेखात जाणून घेऊयात...

गुगलचा हा नवीन फिचर तुमचा जुना जीमेल आयडी बदलण्याची देणार परवानगी
gmail id address
Image Credit source: Tv9 Network
| Edited By: | Updated on: Jan 02, 2026 | 1:06 PM

गुगलने लाखो वापरकर्त्यांसाठी एक बहुप्रतिक्षित फीचर आणण्यास सुरुवात केली आहे. अनेक लोकांनी काही वर्षांपूर्वी प्रत्येकांने त्यांच्या नावाच्या सोईनुसार जीमेल आयडी तयार केले असतील, परंतु जसजसे मोठंमोठे होत जातो तेव्हा आपला जीमेल आयडी थोडा वेगळा व युनिक असावा असं वाटतं, ज्यामुळे जीमेल आयडी शेअर करतानाही चांगल वाटतं. मात्र जुन्या जीमेल आयडी शेअर करताना अनेकांना लाज वाटते. तर या समस्येचे निराकरण करण्यासाठी, गुगलने एक नवीन फीचर आणले आहे जे वापरकर्त्यांना त्यांचे जीमेल आयडी अ‍ॅड्रेस बदलण्याची परवानगी देते. चला तर मग या नवीन फिचरबद्दल आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.

ईमेल पत्ता कोण बदलू शकतो?

9to5Google च्या अहवालानुसार, पत्ता बदलता येतो की नाही हे मूळतः जीमेल आयडी कसे तयार केले गेले यावर अवलंबून आहे.

थर्ड-पार्टी अकाउंट: ज्या वापरकर्त्यांनी Google नसलेल्या ईमेल जसे की Yahoo किंवा Outlook वापरून Google अकाउंट तयार केले आहे ते लिंक केलेला Gmail पत्ता अपडेट करू शकतील.

स्टँडर्ड जीमेल अकाउंट: जर तुम्हाला वाटत असेल की सर्व अकाउंट्स एलिजिबल आहेत, तर ते खरे नाही. गुगलच्या सपोर्ट गाईडलाइंसच्या तत्त्वांमध्ये असे म्हटले आहे की @gmail.com पत्त्यासह अकाउंट्सना अजूनही काही लिमिटेशनचा सामना करावा लागू शकतो.

या रोलआउटला सर्वात आधी गुगल पिक्सेल हब ग्रुपने टेलिग्रामवरद्वारा स्पॉट केलं होतं. गुगलने स्पष्ट केले आहे की लॉग इन करण्यासाठी वापरलेला प्राथमिक ईमेल आयडी बदलला जाऊ शकतो, परंतु डेटा गमावण्यापासून रोखण्यासाठी जुना पत्ता खात्याशी जोडला जाईल.

जीमेल फीचर: तुम्हाला अपडेट मिळेल का?

Google हळूहळू अकाउंट हँडल बदलण्याची क्षमता वाढवत आहे, परंतु हे फिचर अद्याप प्रत्येकासाठी उपलब्ध नाही. तुम्हाला हे फिचर मिळाले आहे का ते तपासण्यासाठी, तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

अकाउंट सेटिंग्ज: तुमच्या डेस्कटॉप ब्राउझरवर तुमच्या Google अकाउंट लॉग इन करा.

वैयक्तिक माहिती: डाव्या नेव्हिगेशन पॅनलमधील पर्सनल इन्फो टॅबवर क्लिक करा.

ईमेल सेटिंग्ज: कॉन्टॅक्ट इन्फो सेक्शन मध्ये ईमेल निवडा आणि नंतर google अकाउंट ईमेल वर टॅप करा.

पात्रता पडताळणी करा: जर सिस्टम तुम्हाला सेटिंग्ज उघडण्याची परवानगी देत ​​नसेल, तर युजरनेम बदलण्याची सुविधा सध्या तुमच्या अकाउंटसाठी उपलब्ध नाही.