
Vivo V70 FE हा स्मार्टफोन या महिन्याच्या सुरुवातीला इंडोनेशियात Vivo V70 सोबत लाँच केला होता. आता कंपनीने या संदर्भात दुजोरा दिला आहे की हा फोन भारतात V70 लाईनअपचे तिसरे मॉडेल म्हणून लाँच होऊ शकतो. या लाईनअपमध्ये आताही Vivo V70 Elite आणि Vivo V70 सामील आहेत. या अपकमिंग फोनसाठी कंपनीच्या साईट आणि Amazon वर डेडिकेटेड मायक्रोसाईट देखील तयार केली आहे. या वेबसाईटवर हळूहळू या फोनची वैशिष्ट्ये सादर केली जाणार आहेत. हा फोन भारतात किमान दोन कलर ऑप्शन आणि ड्युअल रिअर कॅमेरा युनिट्सह दाखल होणार आहे.
एक्सवर एका पोस्टमध्ये कंपनीने या गोष्टीची घोषणा केली आहे की Vivo V70 FE लवकरच भारतात लाँच केला जाणार आहे. Amazonवर फोनसाठी तयार केलेल्या मायक्रोसाईटवर दिलेल्या माहितीनुसार हा फोन कंपनीच्या साईटशिवाय व्हीवोच्या अधिकृत साईटवरही विकला जाणार आहे. याशिवाय या बाबीचाही खुलासा करण्यात आला आहे की ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सोबत या फोनमध्ये २०० मेगा पिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा सेंसर असणार आहे.
मात्र, कंपनीने अजूनपर्यंत या फोनच्या लाँचिंगची तारीख घोषीत केलेली नाही. परंतू टेक ब्लॉगर पारस गुगलानी यांनी दावा केला आहे की Vivo V70 FE भारतात २ एप्रिल रोजी लाँच होऊ शकतो. टिप्स्टरने सांगितले की हा फोन ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट शिवाय १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये देखील उतरवला जाऊ शकतो. या डीव्हाईसची किंमत ३५,००० रुपयांहून कमी असण्याची शक्यता आहे. मात्र, बेस व्हेरिएंट ३०,००० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह उतरवला जाण्याची शक्यता आहे.ज्यात सुरुवाती बँक डिस्काऊंट आणि कॅशबॅक ऑफरचा समावेश आहे.
या कंपनीने काही आठवड्याआधी ९ मार्च रोजी इंडोनेशियात Vivo V70 FE ला IDR ६४,९९,००० ( सुमारे ३५,००० रुपये ) सुरुवातीच्या किंमतीत लाँच केला होता. ही किंमत कंपनीच्या ८ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेजवाल्या बेस व्हेरिएंटची आहे.