तब्बल 6GB रॅम आणि 25 MP कॅमेरा, VIVO च्या नव्या फोनची किंमत फक्त….

मुंबई : जगभरातील मोबाईल कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरु आहे. प्रत्येक कंपनी काही तरी युनिक फीचर्स देऊन ग्राहकांना आकर्षिक करत आहे. व्हिवोनेही एक नवा फोन लाँच केलाय. व्हिवोच्या X21 या फोनचं अपडेटेड व्हर्जन X21s लाँच झालं आहे, ज्यामध्ये डिस्प्ले फिंगरप्रिंट आणि 6GB रॅम देण्यात आली आहे. X21s ची किंमत 25 हजार रुपये असेल असं बोललं जात […]

तब्बल 6GB रॅम आणि 25 MP कॅमेरा, VIVO च्या नव्या फोनची किंमत फक्त....
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

मुंबई : जगभरातील मोबाईल कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरु आहे. प्रत्येक कंपनी काही तरी युनिक फीचर्स देऊन ग्राहकांना आकर्षिक करत आहे. व्हिवोनेही एक नवा फोन लाँच केलाय. व्हिवोच्या X21 या फोनचं अपडेटेड व्हर्जन X21s लाँच झालं आहे, ज्यामध्ये डिस्प्ले फिंगरप्रिंट आणि 6GB रॅम देण्यात आली आहे.

X21s ची किंमत 25 हजार रुपये असेल असं बोललं जात आहे. या फोनमध्ये 6GB रॅम आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज असेल. चीनमध्ये लाँच करण्यात आलेला हा फोन लवकरच भारतातही लाँच केला जाणार असल्याची माहिती आहे.

X21s चे फीचर्स

फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला असून. 6.41 इंचाची फुल एचडी स्क्रिन दिली आहे. 6 जीबी रॅम असलेल्या फोनमध्ये 128 जीबीचे इंटरनल स्टोरेज दिलं आहे.

फोनमध्ये 12+5 मेगापिक्सेल ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये विशेष म्हणजे, अंधारात फोटो काढला तरीही त्यासाठी मोनोक्रोम फ्लॅश लाईटची सुविधा देण्यात आली आहे. तर सेल्फी कॅमेरा 24.8 मेगापिक्सेल देण्यात आला आहे.

फोन अँड्रॉईड 8.1 ओरिओ फनटच ओएसवर काम करतो. बॅटरी क्षमता 3400mAh दिली आहे. फोनमध्ये 4G LTE आणि दुसऱ्या कनेक्टिविटीचा पर्यायही देण्यात आला आहे.