Vivo Y20A | तीन कॅमेरे 5,000mAh ची बॅटरी, VIVO च्या नव्या फोनची किंमत किती?

| Updated on: Jan 02, 2021 | 6:15 PM

Specification, Battery BackUp, Display यामुळे हा फोन चांगलाच लोकप्रिय ठरला होता. (Vivo Y20A smartphone Price And Specifications)

Vivo Y20A | तीन कॅमेरे  5,000mAh ची बॅटरी, VIVO च्या नव्या फोनची किंमत किती?
Follow us on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सर्वाधिक चर्चेत असलेल्या Vivo Y20A या स्मार्टफोनची भारतात विक्री सुरु झाली आहे. हा स्मार्टफोन या आठवड्याच्या सुरुवातीलाच लाँच करण्यात आला होता. त्यानंतर त्याचे Specification, Battery BackUp, Display यामुळे हा फोन चांगलाच लोकप्रिय ठरला होता. (Vivo Y20A smartphone Price And Specifications)

Vivo Y20A या स्मार्टफोनमध्ये वॉटरड्रॉप स्टाईल डिस्प्ले आणि ट्रिपल रिअर कॅमेरा हे लेटेस्ट फिचर देण्यात आले आहेत. त्याशिवाय या फोनमध्ये तुम्हाला 5,000mAh बॅटरी सपोर्टही मिळणार आहे.

Vivo Y20A या स्मार्टफोनच्या 3GB + 64GB या वेरियंटची किंमत भारतात 11 हजार 490 रुपये इतकी आहे. हा फोन Dawn White आणि Nebula Blue या दोन रंगात उपलब्ध आहे.

या फोनची विक्री वीवो इंडियाच्या ऑनलाईन स्टोरद्वारे केली जात आहे. येत्या काही दिवसात इतर प्रमुख ई-कॉमर्स वेबसाईट आणि ऑफलाईन स्टोर्समध्येही हा फोन उपलब्ध होऊ शकतो. Vivo Y20A या फोनवर एक्सचेंज डिस्काऊंट आणि नो-कॉस्ट EMI असे पर्यायही उपलब्ध आहेत.

Vivo Y20A या स्मार्टफोनचे Specification

ड्यूअल सिम (नॅनो) सपोर्ट असणाऱ्या Vivo Y20A या स्मार्टफोनमध्ये Android 11 (Funtouch OS 11) या ऑपरेटिंग सिस्टम आहे. यात 6.51 इंच HD+ (720×1,600 पिक्सल) IPS डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 3GB रॅमसोबतच ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 439 प्रोसेसर आहे.

अनेकांना फोटोग्राफी करण्याची फार आवड असते. अशा व्यक्तींसाठी हा फोन अगदी उत्तम ठरु शकतो. या फोनमध्ये तीन कॅमेरे देण्यात आले आहे. त्यात पहिला 13 MP प्रायमरी कॅमेरा, 2MP पोट्रेट सेन्सर आणि 2MP मायक्रो कॅमेरा आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8 MP चा कॅमेरा देण्यात आला आहे.

या फोनची इंटरनल मेमरी 64GB इतकी आहे. या फोनमध्ये Side Fingerprint Sensor देण्यात आला आहे. तसेच याची बॅटरी 5,000mAh इतकी असून त्याला 10W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट  देण्यात आला आहे.  (Vivo Y20A smartphone Price And Specifications)

संबंधित बातम्या : 

1 जानेवारीपासून Samsung, Apple, LG आणि Moto च्या ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp बंद होणार?

iPhone 12 Series सह अ‍ॅपलच्या इतर आयफोन आणि प्रोडक्ट्सवर मोठी सूट