स्नॅपड्रॅगन 680 SoC, ट्रिपल कॅमेरासह Vivo चा नवीन फोन पुढच्या आठवड्यात भारतात लाँच होणार, किंमत…

| Updated on: Jan 02, 2022 | 2:17 PM

चिनी कंपनी Vivo ने Y सीरीजमध्ये Vivo Y21T हा स्मार्टफोन किफायतशीर ऑफर म्हणून लॉन्च केला आहे. नवीन Vivo फोन वॉटरड्रॉप-स्टाईल डिस्प्ले नॉच आणि ट्रिपल रिअर कॅमेऱ्यांसह सादर करण्यात आला आहे.

स्नॅपड्रॅगन 680 SoC, ट्रिपल कॅमेरासह Vivo चा नवीन फोन पुढच्या आठवड्यात भारतात लाँच होणार, किंमत...
Vivo Y21T
Follow us on

मुंबई : चिनी कंपनी Vivo ने Y सीरीजमध्ये Vivo Y21T हा स्मार्टफोन किफायतशीर ऑफर म्हणून लॉन्च केला आहे. नवीन Vivo फोन वॉटरड्रॉप-स्टाईल डिस्प्ले नॉच आणि ट्रिपल रिअर कॅमेऱ्यांसह सादर करण्यात आला आहे. Vivo Y21T मध्ये Qualcomm Snapdragon 680 SoC देखील आहे आणि 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह सुसज्ज आहे. स्मार्टफोन दोन कलर ऑप्शन्समध्ये येतो. शिवाय, हा फोन एकाच स्टोरेज कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध आहे. असे म्हटले जात आहे की Vivo Y21T पुढील आठवड्यात भारतात लॉन्च केला जाऊ शकतो. (Vivo Y21T ready to launch in India with snapdragon 680 soc and triple rear camera, know price)

Vivo Y21T मध्ये 5,000mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. स्मार्टफोनचं डायमेंशन164.26×76.08x8mm आणि वजन 182 ग्रॅम आहे. Dual-SIM (Nano) Vivo Y21T Android 11 वर Funtouch OS 12 टॉप सह काम करतो. यात 6.51 इंचांचा HD+ (720×1,600 pixels) डिस्प्ले देण्यात आला आहे.

Vivo Y21T च्या लीक झालेल्या रेंडर्सनुसार, समोर एक वॉटरड्रॉप नॉच असेल, ज्यामध्ये सेल्फी कॅमेरा असेल. डिस्प्लेच्या वर उजव्या बाजूला पॉवर बटणे आहेत. यात फिंगरप्रिंट स्कॅनरही मिळेल. यामध्ये कॅमेरा सेटअप स्क्वेअर शेपमध्ये देण्यात आला आहे, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल्सचा असेल आणि एलईडी फ्लॅशलाइट्स असतील. रेंडरमध्ये हा फोन निळ्या रंगात दाखवला आहे.

Vivo Y21T ची किंमत आणि उपलब्धता

Vivo Y21T ची किंमत फक्त 6GB + 128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी IDR 3,099,000 (अंदाजे 16,200) आहे. हा फोन इंडोनेशियामध्ये मिडनाईट ब्लू आणि पर्ल व्हाइट कलर पर्यायांमध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे.

हा फोन भारतात कधी लॉन्च होणार याबद्दलच्या तपशीलांची पुष्टी होणे बाकी आहे, तरीही 4GB + 128GB स्टोरेज कॉन्फिगरेशन असलेला Vivo Y21T देशाच 16,490 रुपये इतक्या किंमतीसह उपलब्ध होईल, अशी माहिती काही रिपोर्ट्सद्वारे मिळाली आहे.

Vivo Y21T चा संभाव्य कॅमेरा सेटअप

या फोनच्या कॅमेराबद्दल बोलायचे झाले तर, याच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल, ज्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे, जो f/1.8 अपर्चर सह येतो. यात 2-2 मेगापिक्सल्सचा सेकेंडरी आणि तिसरा कॅमेरा आहे. यात 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देखील आहे, जो व्हिडीओ कॉलिंगसाठीही उपयुक्त आहे.

इतर बातम्या

Vodafone Idea चे Disney+ Hotstar बेनिफिटवाले प्रीपेड रिचार्ज प्लॅन बंद, जाणून घ्या डिटेल्स

सर्वात जलद चार्ज होणाऱ्या Xiaomi 11i HyperCharge ची लाँच डेट जाहीर, किंमत…

फ्लॅगशिप प्रोसेसर, 60MP कॅमेरासह Moto चा शानदार स्मार्टफोन भारतात लाँचिंगसाठी सज्ज

(Vivo Y21T ready to launch in India with snapdragon 680 soc and triple rear camera, know price)