
आजकाल ऑनलाइनच्या दुनियेत आर्थिक व्यवहार तसेच सोयीसुविधा सोईस्कर होण्यासाठी डिजिटल पद्धतीने काम करत आहोत. मात्र या ऑनलाईनच्या माध्यमातुन अकाउंटवर हॅकिंग आणि सायबर हल्ल्यांचा धोका झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे गुगलने आपल्या वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेसाठी एक खास फीचर लाँच केले आहे. ज्याला गुगल अॅडव्हान्स्ड प्रोटेक्शन प्रोग्राम (Google Advanced Protection Program) म्हणतात. हा कार्यक्रम विशेषतः अशा लोकांसाठी आहे ज्यांना उच्च धोका आहे, जसे की पत्रकार, राजकारणी, सेलिब्रिटी, सरकारी अधिकारी किंवा ज्यांचा डेटा खूप महत्वाचा आहे. गुगलचा हा प्रोग्राम काय आहे आणि तो कसा काम करतो ते आपण आजच्या या लेखात जाणून घेऊयात.
गुगल ॲडव्हान्स्ड प्रोटेक्शन हा एक प्रोटेक्शन प्रोग्राम आहे जो तुमच्या जीमेल, गुगल ड्राइव्ह, फोटो आणि इतर गुगल अकाउंटना अतिरिक्त प्रोटेक्शन देतो. यात एक मजबूत सेक्यूरिटी लेअर आहे जो सामान्य लॉगिनपेक्षा खूपच सुरक्षित आणि चांगला आहे.
यासाठी, प्रथम https://g.co/advancedprotection वर जा. यानंतर तुमच्या गुगल अकाउंटने साइन इन करा. येथील सूचनांचे पालन करून Security Key खरेदी करा आणि सेट अप करा. एकदा सेटअप पूर्ण झाले की, तुमचे अकाउंट ॲडव्हास प्रोटेक्शन मोडमध्ये ठेवले जाईल.
जर तुम्हाला तुमचे गुगल अकाउंट सुरक्षित हवे असेल तर गुगल ॲडव्हान्स्ड प्रोटेक्शन हा एक उत्तम पर्याय आहे. यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतात, परंतु ते तुमचा डेटा सुरक्षित ठेवते आणि हॅकिंगपासून वाचवते. अशातच वर उल्लेख केलेल्या पद्धतीने तुम्ही हे फिचर्स चालू करू शकता.