Tech News : WhatsApp ने अखेर तो महत्त्वाचा निर्णय घेतलाच, केली मोठी घोषणा!

| Updated on: May 14, 2023 | 5:50 PM

अनेक युजर्सनी तक्रार देखील दाखल केली आहे. यूजर्सच्या तक्रारीची दखल घेत मेटा मालकीच्या प्लॅटफॉर्मने मोठी घोषणा केली आहे.

Tech News : WhatsApp ने अखेर तो महत्त्वाचा निर्णय घेतलाच, केली मोठी घोषणा!
Follow us on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअॅपवर आंतरराष्ट्रीय स्पॅम कॉलची अनेक प्रकरणं समोर येताना दिसत आहेत. याबाबत अनेक युजर्सनी तक्रार देखील दाखल केली आहे. यूजर्सच्या तक्रारीची दखल घेत मेटा मालकीच्या प्लॅटफॉर्मने मोठी घोषणा केली आहे.

अनेक यूजर्सनी इंडोनेशिया (+62), व्हिएतनाम (+84), मलेशिया (+60), केनिया (+254) आणि इथिओपिया (+251) शी संबंधित देशांमधून कोडसह कॉल आणि संदेश प्राप्त केल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आता मेटा-मालकीच्या प्लॅटफॉर्मने घोषणा केली आहे की ते स्पॅम प्रकरणे टाळण्यासाठी AI आणि मशीन लर्निंग-आधारित सिस्टम तैनात करत आहेत.

व्हॉट्सअॅपनुसार, AI आणि ML सिस्टममध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. आता नवीन अंमलबजावणीमुळे विद्यमान कॉलिंग दर किमान 50 टक्क्यांनी कमी होईल आणि विद्यमान प्रकरणांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.  व्हॉट्सअॅप आपल्या युजर्सच्या सुरक्षेसाठी आणि सोयीसाठी यावर सतत काम करत आहे.

भारत सरकारच्या या चर्चेचं व्हॉट्सअॅपने केलं पालन

भारत सरकारने केलेल्या कॉलचे पालन व्हॉट्सअॅपने केले आहे.  आयटी मंत्रालयाने म्हटलं होतं की, डिजिटल नागरिकांची सुरक्षितता डिजिटल प्लॅटफॉर्मने सुनिश्चित केली पाहिजे. तसंच प्लॅटफॉर्म यूजर्स कोणत्याही गैरवापर किंवा गोपनीयतेचे उल्लंघन करण्यासाठी जबाबदार असतील.

व्हॉट्सअॅपवर AI आणि ML प्रणाली उपलब्ध असेल

व्हॉट्सअॅपने म्हटलं की, स्पॅम दूर करण्यासाठी आणि स्कॅमर शोधण्यासाठी ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि मशीन लर्निंग (ML) सिस्टीम तैनात करणार आहेत. या सिस्टीम स्पॅम संदेश ओळखू शकतात आणि वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्यापूर्वी ते ब्लॉक करू शकतात.