
मोबाईल फोन भारतात दाखल होऊन आता तीसहून अधिक वर्षे झाली आहेत. १३ जुलै १९९५ साली भारतात प्रथमच मोबाईल सेवेची सुरुवात झाली. आता मोबाईल युजर्सची संख्या ११६ कोटींच्या पार गेली आहे. १९९५ पासून २०२५ पर्यंत मोबाईल फोन संपूर्णपणे बदलला आहे. आता फोनचा वापर केवळ कॉलींगसाठी नाही तर अनेक कामांसाठी केला जातो. आता स्मार्टफोनचा जमाना असून लोक आपले दैनंदिन बँकेचे व्यवहार, रेल्वे, बस,मेट्रो, सिनेमा-नाटक या सर्वांच्या तिकीटांची खरेदी मोबाईलवरुन लिलया करीत आहेत, ऑनलाईन शॉपिंग, फूड ऑर्डर, वाहन चालवताना मॅपचा वापर, कॅब बुकींग यांसारख्या सर्वच सेवांचा वापर मोबाईलवरुन लोक करीत आहेत. टेलिफोनची पहिली यशस्वी चाचणी अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल ( जन्म ३ मार्च १८४७, मृत्यू २ ऑगस्ट १९२२) यांनी १० मार्च १८७६ – रोजी दूरध्वनीचा शोध लावून एकमेकांना संपर्क साधणारी यंत्रणा विकसित केली. त्याआधी लोक पत्र लिहून एकमेकांना संदेश पाठवत असत. ‘तारायंत्र’ देखील जलद गतीने संदेश...