Video: लहान मुलीने कॅन्व्हॉसवर रेखाटलं सुंदर चित्र, पेंटिंग पाहून लोक म्हणाले, चिमुरडी खरंच प्रतीभावान आहे!

हे सुंदर पेंटिंग एका 5 वर्षाच्या मुलीने बनवलं आहे. म्हणूनच या मुलीच्या चित्रकलेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी तिच्या उंचीपेक्षा मोठ्या कॅनव्हासवर पेंटिंग बनवताना दिसत आहे.

Video: लहान मुलीने कॅन्व्हॉसवर रेखाटलं सुंदर चित्र, पेंटिंग पाहून लोक म्हणाले, चिमुरडी खरंच प्रतीभावान आहे!
5 वर्षाच्या मुलीची पेंटिंग
| Edited By: | Updated on: Oct 28, 2021 | 6:29 PM

जगातील प्रत्येकाला कदाचित कॅनव्हासवर रंगांनी काढलेलं सुंदर चित्र पाहायला आवडतं. चित्रकलेच्या कौशल्यामुळेच अनेकांना प्रसिद्धी मिळते. म्हणूनच बहुतेक लोक कधी ना कधी चित्र काढण्याचा प्रयत्न करतात. फक्त लहान मुलांची चित्रं बघितली की, ही कला फक्त लहान मुलांची आहे हे समजतं. पण सध्या एका चिमुरडीचे पेंटिंग खूप व्हायरल होत आहे. (5 year old girl paintings a cute painting on canvas viral video social media)

एका माहितीनुसार, हे सुंदर पेंटिंग एका 5 वर्षाच्या मुलीने बनवलं आहे. म्हणूनच या मुलीच्या चित्रकलेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी तिच्या उंचीपेक्षा मोठ्या कॅनव्हासवर पेंटिंग बनवताना दिसत आहे. मुलीने बनवलेले पेंटिंग खूप सुंदर आहे, ज्यामध्ये काही कार्टून कॅरेक्टर दिसत आहेत.

व्हिडीओ पाहा:

या पेंटिंगमध्ये मुलीने कॅन्व्हॉसवर चित्र रेखाटताना फ्रॉक बदललेले दिसतात. हे पाहून असं दिसतं की, तिला पेंटिंग बनवण्यासाठी काही दिवस लागले असावेत. फार्स्ट फॉरवर्ड करुन हा व्हिडीओ बनवण्यात आला आहे. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडला आहे की, त्याला आतापर्यंत 1 कोटीहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि हजारो लोकांनी तो रिट्विट केला आहे. हा व्हिडिओ नुकताच प्रसिद्ध ट्विटर अकाउंट @buitengebieden_ ने शेअर केला आहे.

सोशल मीडियावरही लोक त्या मुलीचे कौतुक करताना थकत नाहीत. एक व्यक्ती म्हणाली – “हा खूप प्रतिभावान कलाकार आहे, ही कला आयुष्यभर मुलीकडे राहिली पाहिजे.” त्याच वेळी, आणखी एक व्यक्ती म्हणाला- “मुलीची प्रतिभा खरोखर आश्चर्यकारक आहे.” एकाने सांगितले की, मुलीचे चित्र वेगळे नाही, ते खूप सामान्य आहे, तर दुसऱ्याने सांगितले की, मुलीच्या पेंटिंग पॅटर्नमध्ये तिला काही विशेष दिसले नाही.

हेही पाहा:

Video: “माणिके मागे हिते”वर भन्नाट बेली डान्स, डान्सरच्या अदांवर नेटकरी घायाळ

Video: आधी पोराला मार मग त्याच्यासोबतच भन्नाट डान्स, बाप-लेकाचा नात्यातील ओलावा दाखवणारा व्हिडीओ