ईईई, काय, मोतीबिंदूच्या तपासणीसाठी गेला अन् डोळ्यातून निघाले 11 जिवंत किडे

डोळ्यांचा त्रास होत होता म्हणून एक वृद्ध शेतकरी हॉस्पीटलात गेला डोळ्यांची तपासणी केली. पण त्याच्या डोळ्यांत डॉक्टरांना असे काही दिसले की त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. जाणून घ्या सविस्तर

ईईई, काय,  मोतीबिंदूच्या तपासणीसाठी गेला अन् डोळ्यातून निघाले 11 जिवंत किडे
EYES
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 31, 2026 | 3:54 PM

डोळ्यांत काहीतरी गेल्यासारखं वाटलं, डोळे सतत लाल होत होते, धूरकट दिसत होतं म्हणून एक शेतकरी डॉक्टरांकडे गेला. त्याला वाटलं जसं बाकी लोकांना मोतीबिंदू होतात, तसाच हा एक प्रकार असावा. त्यामुळे डॉक्टरांनीही सुरूवातीला त्याला मोतीबिंदूची चाचणी केली. पण या तपासणी दरम्यान असं काही दिसलं त्यामुळे डोके चक्रावून गेले. कारण या शेतकऱ्याच्या डोळ्यात अक्षरक्ष :11 जीवंत किडे सापडले.

मिळालेल्या माहितीनुसार हा 71 वर्षीय शेतकरी गेल्या दोन महिन्यांपासून डोळ्यांच्या त्रासाने हैराण होता. दोन्ही डोळे लाल होणे. धूसर दिसणे असा त्रास त्याला होत होता. त्यानंतर तो रूग्णालयात गेला. त्याला वाटलं मोतीबिंदू असेल म्हणून त्याची चाचणी त्याने सुरू केली.

Loading...

पण चाचणी दरम्यान डॉक्टरांना पापण्या आणि डोळ्यांच्या आतील भागातील जागेत काही पांढरे, लहान जीव हालचाल करताना दिसले. त्यानंतर डॉक्टरांनी भूल देऊन अतिशय काळजीपूर्वक हे किडे बाहेर काढले. या हळूहळू करून डॉक्टरांनी तब्बल 11 किडे त्याच्या डोळ्यातून बाहेर काढले ज्याची लांबी साधारण 11 ते 20 होती.

आणखी खोल तपासणी केल्यानंतर हे किडे किंवा जंत ‘थेलाझिया कॅलिपेडा’ या परजीवी प्रजातीचे राऊंडवर्म असल्याचे कळले. हे परजीवी प्रामुख्याने कुत्रे, मांजर आणि इतर प्राण्यांच्या डोळयांमध्ये आढळतात. मात्र काही परिस्थितीमध्ये माणसांनाही त्यांचाा संसर्ग होऊ शकतो. विशेष म्हणजे त्या किड्यांमध्ये काही मादी होत्या आणि त्यांच्या पोटात छोटे किडे देखील होते. तसेच काही किड्यांच जन्म झाला होता. म्हणजेच काय तर ते किडे प्रजननाच्या अवस्थेपर्यंत पोहोचले होते.

 

आता हे जंत त्या माणसाच्या डोळ्यांत कसे गेले असा प्रश्न पडला असेल?

तर या प्रकरणाचा अभ्यास करणाऱ्या प्रमुख डॉक्टर जी यून सॉन्ग यांनी सांगितले की, यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेशन ( CDC ) नुसार, थेलाझिया नावाचे हे किडे एका विशिष्ट्य प्रकारच्या माशींमुळे पसरतात. या माशा प्राणी आणि माणसाच्या डोळ्यांतील अश्रू वर बसतात. या दरम्यान ते किडे माशींकडून पसरले जातात.

हा सगळा प्रकार दक्षिण कोरियातील एका शेतकऱ्यासोबत घडला.ज्यासाठी त्याने दक्षिण कोरिया कांगवॉन नॅशनल यूनिव्हर्सिटी हॉस्पीटलमध्ये उपचार घेतले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us