Viral Video : लग्न, संसार आणि नोकरीनंतर ट्रक चालवण्याचं स्वप्न केलं पूर्ण; 72 वर्षांच्या ‘बॅडी दादी’ची सोशल मीडियावर चर्चा

घर, संसार आणि नोकरीच्या जबाबदाऱ्या सांभाळल्यानंतर विद्या कौर यांनी वयाच्या 59 व्या वर्षी स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. आता त्या 72 वर्षांच्या आहेत. या वयातही त्या कार, ट्रक यांसारखी वाहने अगदी सहजपणे चालवतात. त्यांच्या या इच्छेचे आणि ड्रायव्हिंग स्किल्सचे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

Viral Video : लग्न, संसार आणि नोकरीनंतर ट्रक चालवण्याचं स्वप्न केलं पूर्ण; 72 वर्षांच्या बॅडी दादीची सोशल मीडियावर चर्चा
BADDY DADI ON SOCIAL MEDIA
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 12, 2026 | 4:35 PM

आपल्याकडं वय झालं की लोक बोलतात. बास्स देवा आयुष्यभर खूप कष्ट केले आता काही माझ्याने राबवत नाही. आता गप्प बसायचं आणि देवाचं नाव जपायचं. पण जम्मूच्या विद्या कौर या आजींना हे काही पटलं नाही बहुतेक.कारण वयाच्या 59 वर्षा त्यांनी गाडी शिकण्याचं ठरवलं आणि आता वयाच्या 72 व्या वर्षी त्या केवळ कारच नाही तर चक्क ट्रकही चालवतात. यामुळे सोशल मीडियावर ती बॅडी दादी म्हणून प्रसिद्ध आहे. तिचाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

विद्या कौर यांच लग्न वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी झालं. त्यानंतर घर, संसार,नोकरी या जबाबदाऱ्यांमध्ये त्यांनी त्यांच आयुष्य खर्ची केलं. त्या शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या आणि पुढे शाळेच्या मुख्याध्यापिका देखील झाल्या. पण एवढं सगळं करत असतानाही गाडी चालवायला शिकण्याची इच्छा मात्र त्यांच्या मनात कायम होती.

Loading...

अखेर वयाच्या 59 वर्षी त्यांनी ड्रायव्हिंग शिकण्याचा निर्णय घेतला. जवळपास 40 वर्ष मनात असलेली इच्छा पूर्ण करायला त्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये पोहोचल्या.पण तिथं त्यांच्या वयामुळे शिकवण्यासाठी नकार दिला. आता दुसरं कोणी असतं तर हान मानली असती, पण विद्या कौर यांनी हार मानली नाही.

 

 

त्यांनी काही दिवसांनी स्वत:ची कार विकत घेतली आणि शेजाऱ्यांची मदत घेतली. शेजारी गाडी शिकवायला तयार झाले. मग काय सुरू झाली रोजची गाडी शिकण्याचा सराव. महिन्याभरात त्या कार चालवायला शिकल्या आणि आज विद्या कौर या फक्त कारच नाही तर मोठाले ट्रक देखील चालवतात. त्यांच्या गाडी चालवण्याच्या व्हिडिओमध्ये त्या अगदी सहजपणे कार हाताळताना दिसत आहेत. पण कार चालवताना आपला पदर नीट करण्याचा त्यांचा अंदाजही लक्ष वेधून घेत आहे. त्यांच्या या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहे. कोणी त्यांना बॅडी दादी म्हणतंय, तर कोणी गो गर्ल म्हणून त्यांच कौतुक करताना दिसत आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us