AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Gaikwad: एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून पाहायचंय, फडणवीसांनी… संजय गायकवाड यांनी पुन्हा मुद्दा उकरत काय हाणला टोला?

Sanjay Gaikwad on Eknath Shinde-Devendra Fadnavis: राज्यात डिलिमिटेशनवरून घमासान सुरू असतानाच आणि सुप्रिया सुळे या मुख्यमंत्री होतील अशी दबकी चर्चा असतानाच बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा मुख्यमंत्रीचा विषय उकरून काढलाय. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी सुद्धा मोठे वक्तव्य केले आहे.

Sanjay Gaikwad: एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून पाहायचंय, फडणवीसांनी... संजय गायकवाड यांनी पुन्हा मुद्दा उकरत काय हाणला टोला?
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून पाहायचंय, गायकवाड म्हणाले काय?
| Updated on: Nov 29, 2026 | 7:51 AM
Share

गणेश सोळंकी, प्रतिनिधी, टीव्ही9 मराठी: उद्यापासून संसदेचे चार दिवसीय विशेष अधिवेशन होत आहे. मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयक सादर होईल. त्यावरून देशासह राज्यात महाभारत सुरू झाले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने राजकारणाला खऱ्या अर्थाने फोडणी दिली आहे. त्यातच राजकीय गणितांना फाट देत सुप्रिया सुळे या राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होतील, असा दबका सुरू ऐकू येत आहे. या राजकीय घडामोडी घडत असतानाच बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाचा विषय उकरून काढला आहे. ‘एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून पाहायचंय’, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला हाणला आहे.

संजय गायकवाड काय म्हणाले?

महाराष्ट्राच्या जनतेला पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून पाहायचे आहे. त्यांच्या काळात जो विकासाचा झंझावात होता, त्याची अपेक्षा सगळे आमदार आणि जनता करत आहे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या मनातील मुख्यमंत्री आहेत, या राज्याचा नाथ एकनाथ पुन्हा व्हावा, हे महाराष्ट्र बोलतोय, असे वक्तव्य बुलडाणा शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केल आहे. तर देवेंद्र फडणवीस हे मोठे नेते आहेत, त्यांची क्षमता देश सांभाळायची आहे. त्यांनी देश सांभाळावा, असा टोला ही देवेंद्र फडणवीस यांना संजय गायकवाड यांनी लागवला आहे.

शिंदे सेनेची दबावाची खेळी?

गेल्या सहा महिन्यात शिंदे सेनेचे आमदार आणि नेते सातत्याने मुख्यमंत्री पदावर पक्षाचा हक्क सांगत आहेत. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी करत आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत NDA मध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही क्रमांक दोनचा मोठा पक्ष ठरला आहे. उद्धव सेनेचे सहा खासदार यावर्षी जून महिन्याच्या अखेरीस फुटले. त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला. त्यामुळे पक्षाची ताकद वाढली आहे. तर उद्धव सेनेवर सर्जिकल स्ट्राईक करण्याची घोषणा ही अधूनमधून होत असते. ऑपरेशन टायगर राबवून ठाकरे सेनेचे आमदार फोडण्यात येणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. यामुळे राज्यातही एकनाथ शिंदे यांची ताकद वाढणार आहे. भाजपचा एक गट शिंदे सेनेला बळ पुरवत असल्याचा आरोप खासदार संजय राऊत सतत करतात. त्यामुळे पक्षाची बार्गेनिंग पॉवर सतत दाखवण्यासाठी अशी चर्चेतील विधानं करण्यात येतात. आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याची चर्चा घडवून आणली आहे. आता हे विधान भाजपला डिवचण्यासाठी आहे की, शिंदे सेनेची ताकद दाखवण्यासाठी हे लवकरच स्पष्ट होईल.

Follow Us
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत
'रेजिम चेंज'वरून फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा; संविधान आणि लोकशाहीबाबत मोठं विधान!
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना..
NDA मध्ये यायचं असेल तर अधिकृत पत्र द्या; प्रफुल्ल पटेलांचा पवारांना सूचक संदेश!
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर..
सिंधुदुर्ग-मुंबई विमानात अचानक बिघाड! प्रवाशांना 2 वेळा उतरवलं, अखेर... प्रवासाचा खोळंबा
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा निर्णय...
सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार कायदेशीर मालकी हक्क? शासनाचा मोठा निर्णय, लाखो कुटुंबांना दिलासा
शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची...
INDIA Alliance Meeting : शरद पवार तसेच DMKची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार; इंडिया आघाडीची पुढील वाटचाल काय?
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन...
दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये NCB ची धडक कारवाई; अमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी दोघे ताब्यात
अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी...
Sharad Pawar Heath Update : अहिल्यादेवी होळकर कॅन्सर हॉस्पीटलमधून शरद पवार पुन्हा ब्रीच कॅन्डी रुग्णालयात
पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा..
राज ठाकरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर पुन्हा निशाणा; NCP ने डिलिमिटेशनला पाठिंबा देताच जुनी पोस्ट केली शेअर!
शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
Sharad Pawar : शरद पवारांची प्रकृती आता कशी? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची हेल्थ अपडेट
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास...
डीलिमिटेशनमुळे संघराज्य व्यवस्थेला धोका? ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न!