हा दगड आहे की मासा? उचलायला आणावी लागली क्रेन; वजनाचा आकडा ऐकून डोकंच गरगरेल

| Updated on: Oct 16, 2022 | 11:06 PM

हा मासा म्हणजे पृथ्वीतलावरील सर्वात वजनदार जीव असल्याचा दावा केला जात आहे.

हा दगड आहे की मासा? उचलायला आणावी लागली क्रेन; वजनाचा आकडा ऐकून डोकंच गरगरेल
Follow us on

नवी दिल्ली : पृथ्वी तलावर हजारो लाखो चित्र-विचित्र जीव पहायला मिळतात. यांना पाहून माणूस आश्चर्य चकित होतात. असाच महाकाय मासा समुद्रात सापडला आहे. या माशाला पाहून हा भला मोठा दगड असल्याचा भास होतो. मात्र, हा मासा म्हणजे पृथ्वीतलावरील सर्वात वजनदार जीव असल्याचा दावा केला जात आहे.

पोर्तुगालच्या अझोरेस समुद्र किनार्‍यावर हा महाकाय मासा मृतावस्थेत सापडला आहे. एखाद्या माशाचे वजन 50 किलो पर्यंत असते. मात्र. या माशाचे वजन तब्बल 2744 किलो इतके आहे.

हा अत्यंत दुर्मिळ प्रजातीचा मासा आहे. या माशाचे नाव ‘सनफिश’ असे आहे. या माशाची लांबी 325 सेंटीमीटर इतकी असून वजन 2744 किलो इतके आहे.

अझोरेस किनाऱ्यावर मृतावस्थेत सापडलेल्या या माशाला पाण्यातून बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली. क्रेनच्या सहाय्याने दोरीने बांधून या माशाला बाहेर काढण्यात आले.

1996 मध्ये जपानमधील कामोगावा येथे असाच एक मासा सापडला होता. ज्याचे वजन सुमारे 2300 किलो होते. तर हा मासा 272 सेमी लांब होता.