VIDEO | म्हशींचा कळप पोहला स्विमिंग पूलमध्ये, लाखो रुपयांचं नुकसान पाहून मालकाने डोक्याला हात लावला

VIRAL VIDEO | ज्यावेळी म्हशींचा कळप अचानक स्विमिंग पूलमध्ये दाखल झाला, त्यावेळचं तिथलं सीसीटिव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. म्हशींच्या कळपाने लाखो रुपयाचं नुकसान केल्यामुळे मालकाला डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे.

VIDEO | म्हशींचा कळप पोहला स्विमिंग पूलमध्ये, लाखो रुपयांचं नुकसान पाहून मालकाने डोक्याला हात लावला
swimming pool
Image Credit source: tv9marathi
| Updated on: May 26, 2023 | 7:50 AM

मुंबई : सध्या सोशल मीडियावर (social media) एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये म्हशींचा एक कळप एका घरातील नव्या स्विमिंग पूलमध्ये (swimming pool) पोहत असल्याचा पाहायला मिळत आहे. त्यावेळी स्विमिंग पूलमध्ये अचानक 18 म्हैशी आल्यामुळे मालकाची आणि तिथं असणाऱ्या लोकांची मोठी गडबड निर्माण झाली होती. काही म्हैशींनी पाण्यात उड्या घेतल्या असल्यामुळे स्विमिंग पूलचं (trending news) मोठं नुकसान झालं आहे. हा प्रकार सकाळी झाला असल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे.

लाखो रुपयांचं नुकसान

सीसीटिव्ही फुटेजमध्ये हा सगळा प्रकार कैद झाला आहे. विशेष म्हणजे २५ लाख रुपयांचं नुकसान झाल्यामुळे मालकाला डोक्याला हात लावण्याची वेळी आली आहे. त्याबरोबर तो स्विमिंग पूल नुकताचं तयार करण्यात आला होता.

उरलेल्या दहा म्हैशींनी तिथं असलेल्या…

एंडी आणि लिनेट स्मिथ, दोघेही सेवानिवृत्त आहेत. त्यांनी सांगितलं की, आठ म्हशी स्विमिंग पूलमध्ये उतरल्या होत्या. त्यांनी संपुर्ण स्विमिंग पूलमध्ये हौदोस घातला. त्याचबरोबर उरलेल्या दहा म्हैशींनी तिथं असलेल्या फुलांचं आणि इतर झाडाचं नुकसान केलं आहे. जनावरांना तिथं कसल्याही प्रकारचा त्रास दिला नाही. ही घटना गेल्यावर्षी जुलै महिन्यात घडली होती.

एका म्हैशीने मोठा हौदोस घातला

एंडी स्मिथ यांनी गार्जियनला सांगितलं की, ज्यावेळी त्यांची पत्नी सकाळी चहा तयार करीत होती. तर त्यावेळी त्यांनी किचनची खिडकी उघडली. त्यावेळी त्यांना स्विमिंग पूलमध्ये आठ म्हैशी पोहत असल्याचं दिसल्या. त्यानंतर त्यांनी 999 या नंबरला कॉल करुन फायरब्रिगेडला माहिती दिली. परंतु त्यांनी अशा पद्धतीचा खोटा कॉल घेण्यास नकार दिला. परंतु त्यांना हे गंभीर प्रकरण समजून सांगितलं. ज्यावेळी ते घटनास्थळी दाखल झाले, त्यावेळी त्यांची कपडे पाहून एका म्हैशीने मोठा हौदोस घातला.


मात्र, नंतर परिस्थिती नियंत्रणात आली, मात्र यादरम्यान म्हशीने त्यांचे 25 लाखांचे नुकसान केले. NFU म्युच्युअल इन्शुरन्सच्या प्रवक्त्याने माहिती दिली की, दाव्याचे निराकरण आणि पैसे दिले गेले आहेत.