Yaniv Sarudi : एका व्यक्तीने फिल्मी स्टाईलमध्ये हमासच्या दहशतवाद्यांपासून 8 लोकांना वाचवले

| Updated on: Oct 11, 2023 | 2:52 PM

Who Was Yaniv Sarudi: इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील युद्धात शौर्य आणि बलिदानाची एक चांगली गोष्ट उजेडात आली आहे. लोक यानिव सरुदीला खरा हिरो म्हणत आहेत. त्याने आठ लोकांचा जीव वाचवला आहे.

Yaniv Sarudi : एका व्यक्तीने फिल्मी स्टाईलमध्ये हमासच्या दहशतवाद्यांपासून 8 लोकांना वाचवले
Who Was Yaniv Sarudi
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली : गाजा पट्टीवरुन शनिवारी ज्यावेळी अतिरेक्यांनी (terrorist attack) इस्रायलवरती रॉकेट (israel attack) हल्ला केला. त्यावेळी लोकांना समजलं नाही, की नेमकं काय झालं आहे. ते फक्त सुरक्षेच्या कारणास्तव पळाले. हमासने केलेल्या हल्ल्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ज्यावेळी हल्ला झाला, त्यावेळी काही लोकांना आपला जीव धोक्यात घालून इतरांचा जीव वाचवला. अशदोद येथील 26 वर्षीय यानिव सरुदी (Yaniv Sarudi) हा तरुण चर्चेत आला आहे. या तरुणाने आठ लोकांचा जीव वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घातला. जाणून घ्या खऱ्या हिरोची स्टोरी.

या तरुणाची स्टोरी झाली, ती तो एका ठिकाणी फसल्यामुळं, परंतु त्याने केलेल्या धाडसामुळं आठ लोकांचा जीव वाचला आहे. त्या तरुणाने आतंकवाद्यांच्या समोरुन आठ लोकांना सोबत घेऊन सुरक्षित ठिकाणी पोहोचवले. या कारणामुळे तो चर्चेत आला आहे.

हे सुद्धा वाचा

सरुदी या तरुणावरती बेछूट गोळीबार सुरु होता. तरी सुध्दा त्याने हिंमत दाखवली. शेवटी त्या तरुणाला दोन तासांनी यश मिळालं. इस्रायलचे कमांडोंनी त्याला मदत केली. परंतु तो तरुण आतंकवाद्याच्या गोळीबारात गंभीर जखमी झाला आहे. त्याने आठ लोकांचा जीव वाचवला आहे. परंतु त्या तरुणाने तिथली परिस्थिती निवळल्यानंतर जीव सोडला आहे.

सांगितले जात आहे की, ज्यावेळी सुरुवातीला आतंकवाद्यांनी हल्ला केला, त्यावेळी तिथं अधिक तरुण हजर होते. तो तरुण सुरुवातीपासून टार्गेट केला होता. त्यामुळे तो अधिक जखमी झाला. हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर इस्रायल सरकारकडून प्रति हल्ला करण्यास सुरुवात केली.