
नवी दिल्ली | 1 सप्टेंबर 2023 : सोशल मिडीयावर रोज नवनवीन घटनांचे पडसाद पाहायला मिळत असतात. अनेकवेळा काही व्हिडीओ पाहून आपल्याला धक्का बसतो. आपल्या डोळ्यांवर आपला विश्वास बसत नाही असे काही व्हिडीओ असतात. आता असाच एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला असून तो पाहून युजर हैराण होत आहेत. अनेक लोकांना हा व्हिडीओ पाहून धक्का बसला आहे, तर काही लोकांना तो गंमतीदार वाटत आहे, त्यामुळे या व्हिडीओला वारंवार पाहीले जात आहे.
सोशल मिडीआवरील इंस्टाग्रामच्या पेजवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात व्हिडीओत एक टायर पंक्चर काढण्याचे दुकान दिसत आहे. या दुकानात काही कर्मचारी मोठ्या ट्रकचा टायर पंक्चर काढण्याचे काम करीत आहेत. तेव्हा अचानक या मोठ्या टायरमधील ट्युबचा ब्लास्ट होऊन कर्मचारी हवेत उडाल्याचे दिसत आहे. हा खतरनाक प्रकार पाहून आजूबाजूचे लोकही हैराण झाल्याचे दिसत आहेत.
धक्कादायक व्हिडीओ येथे पाहा –
या व्हिडीओत आपण पाहू शकता की एक टायर पंक्चर काढण्याचे मोठे गॅरेज दिसत आहे. तिथे एका मोठ्या ट्रकचे टायरला काही लोक उचलून त्याची दुरुस्ती करताना दिसत आहे. परंतू दुसऱ्या क्षणाला या टायरमधील ट्युब अचानक फुटते. आणि त्यातून वेगाने आलेल्या हवेच्या प्रेशरने टायरसह दोन-तीन कर्मचारी चक्क हवेत उडाल्याचे दिसत आहे.
इंस्टाग्रामवर या व्हिडीओला bogor.gembira नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आले आहे. या व्हिडीओला सात कोटी वेळा पाहण्यात आले आहे. तीन लाख लोकांनी या व्हिडीओला लाईक्स केले आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केले आहे. एका युजरने लिहीले आहे की या क्लिपला अनेकवेळा पाहत आहे. दुसऱ्या एका युजरने लिहीलेय की हे कसे झाले? या व्हिडीओ पाहून तुम्हाला काय वाटतंय ?