Viral Video: पैसे-ज्वेलरीने भरलेली तिजोरी, उघडताच नाग फणा काढून… नंतर जे झालं थक्क करणारा व्हिडीओ

Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये पैसे आणि सोन्याच्या ज्वेलरीने भरलेल्या तिजोरीत चक्क नाग दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वजण थक्क झाले आहेत.

Viral Video: पैसे-ज्वेलरीने भरलेली तिजोरी, उघडताच नाग फणा काढून... नंतर जे झालं थक्क करणारा व्हिडीओ
Snake
Image Credit source: Social Media
| Updated on: Sep 27, 2025 | 4:01 PM

सोशल मीडियावर कधीकधी असे काही व्हिडीओ दिसतात, जे पाहून आश्चर्य वाटतं आणि लोक घाबरून जातात. असाच एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक विषारी, खतरनाक नाग पैशांनी आणि सोन्याच्या ज्वेलरीने भरलेल्या तिजोरीत घुसलेला दिसत आहे. हे दृश्य इतकं भयानक आहे की, पाहणाऱ्यांचा थरकाप उडत आहे. आता लोक विचार करत आहेत की, ही नाग तिजोरीत शिरला कसा? कारण तिजोरी ही बंदच असते.

नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, लोखंडी तिजोरीत नाग फणा काढून बसला आहे. तिजोरीत पैशांचे बंडल आणि सोन्याचे दागिने ठेवलेले दिसत आहेत. यावरच साप फणकाढून बसलेला दिसतो. एखादी व्यक्ती या तिजोरीत हात टाकण्याचा प्रयत्न करते, तेव्हाच नाग हल्ला करतो. नाग चिडलेला दिसत आहे. सापाचे फुत्कारणे व्हिडीओमध्ये ऐकू येत आहेत. हा व्हिडीओ पाहणाऱ्यांचा थरकाप उडत आहे. तिजोरीत असा विषारी साप घुसणं हे कोणासाठीही भयावह स्वप्नापेक्षा कमी नाही. साधारणतः बाथरूम किंवा बेडरूममध्ये साप घुसणं सामान्य असतं, पण तिजोरीत साप घुसला, ही खूपच आश्चर्यकारक बाब आहे.

वाचा: मला घरी स्पष्टीकरण…; कपड्यांवरून ट्रोल झाल्यानंतर अमृता फडणवीस स्पष्ट बोलल्या

हा धक्कादायक व्हिडीओला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (ट्विटर) वर @abhishek902444 या आयडीवरून शेअर केला गेला आहे. हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘नेहमी फक्त ऐकलं होतं, आज पाहताही आले. जुन्या लोकांकडून, आजी-आजोबांकडून ऐकलं होतं की, आधी जमिनीत जिथे धन पुरलं जायचं तिथे सापाची रक्षा करायचे. पण हा साप लोखंडी कपाट, तिजोरीत कसा पोहोचला? इथला पत्ता कोणी दिला या सापाला.

युजर्स काय म्हणत आहेत?

फक्त १० सेकंदांच्या या व्हिडीओला आत्तापर्यंत ३ लाख ७६ हजारांपेक्षा जास्त वेळा पाहिले गेले आहे. तसेच शेकडो लोकांनी व्हिडीओला लाईक केलं आहे आणि विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. बहुतांश युजर्स हा व्हिडीओपाहून आश्चर्यचकित झाले आहेत. साप तिजोरीत कसा घुसला? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. एका युजरने लिहिलं आहे, ‘जलवा आहे भाई नागराजाचा. हा तर खूप धोकादायक व्हिडिओ आहे. तिजोरीत साप कसा येऊ शकतो?’, तर दुसऱ्या युजरने लिहिलं आहे, ‘ही गोष्ट बरोबर आहे, आमच्या घरातही माझ्या आजी आणि नानी सांगायच्या की, धनाची रक्षा साप करतात. ही बाब खूप हदपर्यंत बरोबर ठरली आहे’.