Video: साप चावल्यावर महिलेला रुग्णालयात नेण्याऐवजी पतीने जे केलं ते पाहून धक्काच बसेल

Viral Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एका महिलेला सापाने दंश केला आहे. तिला हॉस्पिटलमध्ये नेण्याऐवजी लोकांनी गावातच ठेवले आहे. नेमकं काय झालं? पाहा व्हिडीओ...

Video: साप चावल्यावर महिलेला रुग्णालयात नेण्याऐवजी पतीने जे केलं ते पाहून धक्काच बसेल
Viral Video of Snake
Image Credit source: Social Media
| Updated on: Aug 29, 2025 | 2:09 PM

सापचे नाव जरी घेतले तरी अनेकांचा थरकाप उडतो. साप दिसल्यानंतर चावेल या भीतीने अनेकजण पळ काढताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर देखील असाच एक सापाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एका महिलेला साप चावला आहे. तिच्या पतीने साप चावल्यानंतर तिला रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी जे काही केले त्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे? त्या महिलेचे प्राण वाचले का? असे अनेक प्रश्न सर्वांना पडला आहेत. चला जाणून घेऊया या व्हिडीओविषयी सविस्तर…

नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ बिहारमधील सीतामढी येथील आहे. या गावातील एका महिलेला नाग चावला. पण तिच्या पतीने तिला साप चावल्यानंतर रुग्णालयात नेण्याऐवजी गावकऱ्यांनी तिच्यावर भूतविद्या करुन विष उतरवण्याचा प्रयत्न केला. गावकऱ्यांच्या या अंधश्रद्धेमुळे त्या महिलेचा जीव गेला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Video: तोंडातून रक्त आलं पण तो थांबला नाही! डोळ्यात पाणी आणणारा व्हिडीओ व्हायरल

काय आहे व्हिडीओ?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक महिला जमिनीवर झोपलेली दिसत आहे. तिच्या भोवती गावकरी जमा झाले आहेत. तसेच त्यामधील एक पुरुष हा काठीच्या सहाय्याने नागाला त्या महिलेच्या शरीरावर ढकलताना दिसत आहे. जेणेकरुन हा नाग महिलेच्या शरीरातून विष शोषून घेईल असा विश्वास गावकऱ्यांचा होता. पण असे न होता सतत सापाला महिलेच्या अंगावर ढकल्यामुळे त्याने अनेकदा महिलेला दंश केला. लोकांच्या अंधविश्वासामुळे त्या महिलेचा जीव गेला असल्याचे म्हटले जात आहे. त्या महिलेला साप नेमका कसा चावला? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

एका एक्स यूजरने बिहारमधील हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने हा व्हिडीओ शेअर करत, ‘फिल्मी अंधविश्वासाने महिलेचा जीव घेतला. बिहारमधील एका महिलेला कोब्रा सापाने दंश केला. त्या महिलेला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याऐवजी त्यांनी जादूटोना करण्याचा प्रयत्न केला. एका व्यक्तीने तर जबरदस्ती सापाला विष शोशून घेण्यासाठी त्या महिलेच्या अंगावर जाण्यास भाग पाडले. त्याने त्या महिलेला अनेकदा दंश केला. हे केवळ सिनेमांमध्ये पाहायला मिळते’ या आशयाचे कॅप्शन दिले. सध्या सोशल मीडियावर या महिलेचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.