
नवी दिल्ली, दि.22 जानेवारी 2024 | सध्या अनेक प्रकारचे डान्स लोकप्रिय होऊ लागले आहेत. सोलो डान्स, कपल डान्स, ग्रुप डान्स अनेक तुम्ही पाहिले असतील. अनेक डान्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. परंतु आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X म्हणजेच ट्विटरवर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अप्रतिम डान्समुळे दोन दिवसांत कोट्यवधी लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. अनेक युजर त्यावर आपल्या कॉमेंट देत आहेत. शेअर करत आहेत. X वर सर्वाधिक ट्रेंड करणारा हा व्हिडिओ ठरला आहे. ट्विटरवर सर्वाधिक ट्रेंड होणार हा व्हिडिओ ठरला आहे.
व्हिडिओला आतापर्यंत 1.20 कोटीपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाल्या आहेत. या व्हिडिओमध्ये ग्रुप डान्स आहे. अप्रतिम सादरीकरण असलेल्या या डान्समध्ये ग्रुपच्या सदस्यांमध्ये कमालीचे ताळमेळ आहे. या ग्रुपच्या सर्व सदस्यांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले आहेत. हा व्हिडिओ तुम्ही एकदा पाहून थांबणार नाही. वारंवार हा व्हिडिओ तुम्ही पाहणार आहेत.
Synchronisation
pic.twitter.com/7QzCcoofCl— Science girl (@gunsnrosesgirl3) January 19, 2024
व्हिडिओ Science girl नावाच्या युजरने X वर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये युजरने फक्त ‘Synchronisation’ हा शब्द लिहिला आहे. या एका शब्दात सर्व काही सांगितले आहे. या शब्दाचा अर्थ एक जीव असणे आहे. या व्हिडिओला 140K पेक्षा जास्त लाइक मिळाल्या आहेत. तसेच 8.5 K पेक्षा जास्त शेअर हा व्हिडिओ झाला आहे. व्हिडिओवर कॉमेंट करताना युजरने कौतूक केले आहे. एका युजरने म्हटले आहे की, आजच्या दिवसातील सर्वात सुंदर व्हिडिओ पाहिला आहे.
व्हिडिओ शेअर करणार युजर कोणत्या देशातील आहे, हे स्पष्ट झाले नाही. तसेच हा व्हिडिओ कोणत्या देशातील हे समजू शकले नाही. परंतु इंटरनेटच्या जगात कमालीचा लोकप्रिय हा व्हिडिओ ठरला आहे.