Amazon: पिंक कलरची गोंडस बादली! भोळ्या-भाबड्या लोकांना वाटलं किंमत चुकीची, ऐकून बजेट कोलॅप्स…

| Updated on: May 25, 2022 | 2:24 PM

फॅशन आणि ट्रेंड्स त्यात ते ऑनलाईन शॉपिंग (Online Shopping) म्हणजे आता एक प्रकारचं सामाजिक प्रेशर झालंय. ऑनलाईन शॉपिंग केलीच पाहिजे, कितीही महाग असो ती वस्तू ऑनलाईन घेतलीच पाहिजे. सामाजिक प्रेशरच ना हे ? प्लास्टिक बादली जर माणूस ऑनलाईन घेत असेल आणि ती ही इतकी महाग तर मग अवघड आहे एकंदरीतच सगळं ! बरं मग आता ऑनलाईन शॉप्स तर मग आपला बिझनेस टिकवायचा म्हणून या "ग्राहकांना वेड्यात काढण्याच्या स्पर्धेत"

Amazon: पिंक कलरची गोंडस बादली! भोळ्या-भाबड्या लोकांना वाटलं किंमत चुकीची, ऐकून बजेट कोलॅप्स...
पिंक कलरची गोंडस बादली!
Image Credit source: Amazon Official Website
Follow us on

13 लिटरची पिंक कलरची प्लास्टिक बादली (Plastic Bucket) आहे. कितीला असेल? आपण विचार करतो प्लॅस्टिकची बादली असून असू कितीला असेल ? अहो पैज लावतो इतकी महाग बादली खुद्द अंबानी सुद्धा घेत नसतील. अनेकदा मंडळी फॅशन, ट्रेंड्स अशा नावाखाली ग्राहकांना इतकं फसवलं जातं कि ग्राहक सुद्धा सहजच फसले जातात. फॅशन आणि ट्रेंड्स त्यात ते ऑनलाईन शॉपिंग (Online Shopping) म्हणजे आता एक प्रकारचं सामाजिक प्रेशर झालंय. ऑनलाईन शॉपिंग केलीच पाहिजे, कितीही महाग असो ती वस्तू ऑनलाईन घेतलीच पाहिजे. सामाजिक प्रेशरच ना हे ? प्लास्टिक बादली जर माणूस ऑनलाईन घेत असेल आणि ती ही इतकी महाग तर मग अवघड आहे एकंदरीतच सगळं ! बरं मग आता ऑनलाईन शॉप्स तर मग आपला बिझनेस टिकवायचा म्हणून या “ग्राहकांना वेड्यात काढण्याच्या स्पर्धेत” उतरणारच. Amazon (Amazon) कसं मागे राहील ? सध्या Amazon वर असलेल्या एका प्लास्टिकच्या बादलीची चर्चा आहे. ही साधी बादली इतकी चर्चेत का आहे, याचं कारण ऐकून तुम्हीही हैराण व्हाल.

प्लॅस्टिकची बादली कुणीही पैज लाऊन सांगेल कि ती 300 च्या वर मिळणार नाही. फारच ब्रँड वगैरे म्हटलं तर 500 च्या वर तर नक्कीच मिळणार नाही. पण Amazon ने ग्राहकांना मुर्खात काढायच्या सगळ्या सीमा सहज पार केल्यात. गुलाबी रंगाच्या साध्या प्लास्टिकच्या बादलीची किंमत Amazon ने 26000 रुपये लावलीये. विशेष म्हणजे ती विकली जातीये, तुमच्या आमच्या सारखे सामान्य लोकं ती 26000 बादली विकत घेतायत.

हे सुद्धा वाचा

हे तर काहीच नाही

हे तर काहीच नाही, ही पिंक कलरची प्लॅस्टिकची बादली आधी 35,900 रुपयाला होती तिच्यावर 28 टक्के डिस्काउंट लावलं गेलं आणि मग तिची किंमत झाली 26000 रुपये ! आधी भोळ्या भाबड्या लोकांना वाटलं किंमत चुकीची लिहिली गेली असेल. लोकांनी नीट तपासून पाहिलं पण बघतात तर काय किंमत खरंच तेवढीच होती डिस्काउंट देऊन सुद्धा ! एका ट्विटर युजरने याचा फोटो आणि किंमत सोशल मीडियावर शेअर केलीये. अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी ही किंमत ऐकून धक्का बसल्याचं म्हटलंय. तर काहींनी मजेशीर कमेंट करत आता यासाठी किडनी विकावी लागेल असं म्हटलं आहे.