AC चा जुगाड, उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी व्हिडिओ शेअर करताच लाखो जणांकडून…

| Updated on: Mar 17, 2024 | 3:53 PM

Anand Mahindra AC Water Shortage Post: मायक्रो ब्लागिंग प्लॅटफॉर्म एक्सवर त्यांचे असे अनेक व्हिडिओ आहेत. आता आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यांच्या या पोस्टमुळे एका गहन प्रश्नाकडे लक्ष वेधले गेले आहे.

AC चा जुगाड, उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी व्हिडिओ शेअर करताच लाखो जणांकडून...
Follow us on

नवी दिल्ली | 17 मार्च 2024 : सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. त्यामुळे देशातील लाखो तरुण त्यांना सोशल मीडियावर फॉलो करत असतात. समाजातील आगळे वेगळे विषय ते समोर आणत असतात. मायक्रो ब्लागिंग प्लॅटफॉर्म एक्सवर त्यांचे असे अनेक व्हिडिओ आहेत. आता आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यांच्या या पोस्टमुळे एका गहन प्रश्नाकडे लक्ष वेधले गेले आहे. भाविष्यातील संकट ओळखून आता करावी लागणारे उपाय त्यांनी सांगितले आहे. वाया जाणारे पाणी कसे वाचवता येईल, यासंदर्भातील व्हिडिओ त्यांनी समोर आणला आहे. AC चा जुगाड सर्वांनी वापरल्यास मोठ्या प्रमाणावर पाण्याची बचत होऊ शकते.

काय आहे व्हिडिओमध्ये

एसीमधून कशा पद्धतीने पाणी मिळू शकते, हे या व्हिडिओत दाखवले आहे. त्यासाठी केलेला एक प्रयोग या व्हिडिओत मांडला आहे. आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ त्यांच्या X अकाउंट @anandmahindra शेअर केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, ‘ज्या ठिकाणी एसीचा वापर होत आहे, त्याठिकाणी या पद्धतीचे उपकरण लावले गेले पाहिजे. पाणीच संपत्ती आहे. त्याला सुरक्षित पद्धतीने संग्रहित करण्याची गरज आहे.’

हे सुद्धा वाचा

असा आहे प्रयोग

व्हिडिओमध्ये एक प्रयोग करुन एसीमध्ये निर्माण होणारे पाणी कसे वापरता येईल, हे दाखवले आहे. त्यासाठी एसीच्या पाईपमध्ये लहान तोटी लावली आहे. त्या ठिकाणी पाणी संग्रहीत करुन नंतर त्याचा वापर करता येतो. हे पाणी उद्यान, गाडी धुण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी वापरत येते.

आनंद महिंद्रा यांनी ट्विट केलेला हा व्हिडिओ लाखो जणांनी पाहिला आहे. हजारो जणांनी त्याला लाईक केले आहे. अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी पाण्याची गंभीर परिस्थिती मांडली आहे. पाण्याचे महत्व दाखवणारे इतर व्हिडिओ काही जणांनी दिले आहे.