आनंद महिंद्रा यांच्याप्रमाणेच हे व्यंगचित्र बघताच तुमचेही डोळे उघडतील…बघा

त्यांनी ट्विटरवर एक व्यंगचित्र शेअर केलं असून हे अत्यंत निराशाजनक व्यंगचित्र असल्याचं त्यांनी लिहिलं आहे.

आनंद महिंद्रा यांच्याप्रमाणेच हे व्यंगचित्र बघताच तुमचेही डोळे उघडतील...बघा
Anand Mahindra
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 27, 2022 | 5:28 PM

भारताचे दिग्गज उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात आणि अनेकांना प्रोत्साहन देत असतात. अनेक वेळा ते स्वत: आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना मदत करतानाही दिसले आहेत. काही वेळा ते संदेश देण्याचाही प्रयत्न करतात. सध्या त्यांचं एक ट्विट बरंच चर्चेत आहे. या ट्विटमध्ये त्यांनी निराशा व्यक्त केलीये त्यांनी लोकांना इशाराही दिलाय.

खरं तर त्यांनी ट्विटरवर एक व्यंगचित्र शेअर केलं असून हे अत्यंत निराशाजनक व्यंगचित्र असल्याचं त्यांनी लिहिलं आहे. यामुळे मला फोन खाली ठेवण्यास भाग पाडले गेले आहे. हे ट्विट केल्यानंतर मी माझा फोन खाली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी मान सरळ असेल आणि दिवस डोके वर करून घालविला जाईल याची काळजी घ्या, असेही त्यांनी लिहिले आहे.

त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, मी निराश आहे. या कॅप्शनने संपूर्ण गोष्ट कदाचित समजू शकणार नाही, परंतु फोटो पाहिल्यानंतर संपूर्ण गोष्ट समजेल.

खरं तर या चित्रात एका नर्सिंग होमचं चित्र दाखवणारं एक कार्टून दिसत आहे आणि त्यात तीन वृद्ध आपल्या रिकाम्या हातांकडे जणू काही मोबाइल धरल्याप्रमाणे पाहत आहेत. पण त्यांच्या हातात मोबाइल नसून रिकामे हात आहेत.

खरं तर मोबाइल आणि लॅपटॉपमध्ये आपण इतके बिझी झालो आहोत की आपलं शरीर वाकडं झालं आहे आणि मान उचलण्याचा प्रयत्नही आपण कधी करत नाही, हे सांगण्याचा प्रयत्न या व्यंगचित्राच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

हे असेच चालू राहिले तर नर्सिंग होममध्ये गेल्यावर आपली अशी अवस्था होईल. सध्या त्याची ही पोस्ट व्हायरल होत आहे.