Anaya Bangar: मुलगा होता, मुलगी बनला! अनाया बांगरचा मोनोकिनीमधला हॉट लूक, शरीर पाहून अनेकांच्या कमेंट्स

Anaya Bangar: भारताचा माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांची कन्या अनाया बांगरने नुकताच सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिने या पोस्टमध्ये एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने मोनोकिनी परिधान केल्याचे दिसत आहे.

Anaya Bangar: मुलगा होता, मुलगी बनला! अनाया बांगरचा मोनोकिनीमधला हॉट लूक, शरीर पाहून अनेकांच्या कमेंट्स
Anaya Bangar
| Updated on: Sep 03, 2026 | 9:14 AM

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक संजय बांगर यांची कन्या अनाया बांगर सध्या चांगलीच चर्चेत आहे. मुलापासून मुलगी झालेल्या अनया बांगची सर्वत्र चर्चा झाली. आता अनायाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अनायाने सोशल मीडियावर थेट मोनोकिनीतील व्हिडीओ शेअर केला आहे. तिचा लूक पाहून चाहते चकीत झाले आहेत.

कॅप्शनने वेधले लक्ष

अनाया सध्या थायलंडमध्ये आहे आणि तिने तिथून तिने काही व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये ती नोकिनीमध्ये दिसत आहेत. फोटो समोर येताच सोशल मीडिया वापरकर्त्यांनी कमेंट बॉक्समध्ये भरभरून प्रेम व्यक्त करायला सुरुवात केली. अनायाची ही पोस्ट केवळ तिच्या लूकमुळेच चर्चेत नाही. त्यासोबत लिहिलेले कॅप्शनही खूप खास आहे. तिने आपला फोटो शेअर करताना स्वतःला स्वीकारण्याची आणि आपल्या शरीरातील बदलांना अॅक्सेप्ट करण्याची गोष्ट सांगितली.

अनायाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती केशरी रंगाच्या मोनोकिनीमध्ये दिसत आहे. अनाया एका स्विमिंग पूलच्या पुढे उभी आहे आणि ती मागे असलेली सिनरी दाखवताना दिसत आहे. सोबतच तिचा लूक पाहण्यासारखा आहे. हा व्हिडीओ शेअर करत अनायाने, एक शरीर ज्याला ओळखण्यासाठी मला कधी संघर्ष करावा लागत होता, आता एक शरीर ज्याला मी माझे घर म्हणते’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. म्हणजे ज्या शरीराला ओळखण्यासाठी तिला कधी संघर्ष करावा लागत होता, आता तेच शरीर त्यांना आपले घर म्हणजेच आपलेसे वाटत आहे. अनाया यांनी पुढे लिहिले की शेवटी स्वतःला त्या प्रकारे खूप सुंदर वाटू लागले आहे. तिने आपल्या या अनुभवाचे वर्णन ‘जेंडर युफोरिया’ असे केले आणि त्यासोबत गुलाबी हृदय आणि चमकदार इमोजीही लावले.

थायलंडमधून शेअर केला ग्लॅमरस अंदाज

अनाया यांनी थायलंडला पोहोचल्यानंतर हा फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. फोटोमध्ये त्यांचा सुट्टीचा लूक दिसत आहे. मोनोकिनीमध्ये अनायाचा हा अंदाज पोस्टचे सर्वात मोठे आकर्षण ठरला. फोटो पोस्ट झाल्यानंतर चाहत्यांनी आणि सोशल मीडिया वापरकर्त्यांनी कमेंट्सद्वारे प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी तिला सुंदर तर कोणी सेक्सी असे म्हटले आहे.

नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया

अनायाच्या फोटोवर कमेंट करणाऱ्यांमध्ये अनेक वापरकर्त्यांनी हृदय आणि फायर इमोजीचा वापर केला. एका नेटकऱ्याने “सुंदर” असे लिहिले, तर दुसऱ्याने फक्त हृदय आणि फायर इमोजीद्वारे प्रतिक्रिया दिली. आणखी एका नेटकऱ्याने “खूप सुंदर” असे लिहिले आहे. काही वापरकर्त्यांनी सलग अनेक हृदय आणि फायर इमोजी शेअर करून अनायाच्या लूकची प्रशंसा केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us